BMC Budget: देशातील सर्वात मोठी महापालिका असलेल्या बीएमसीचे वर्ष 2021-22 साठी आर्थिक बजेट बुधवारी (3 फेब्रुवारी) सादर केले जाणार आहे. दीड कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या मुंबईतील नागरिकांकडून बजेटची वाट पाहिली जात आहे. तसेच अर्थसंकल्पाकडून अनेक अपेक्षा सुद्धा नागरिकांच्या आहेत. याच दरम्यान, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर आरोग्य सेवासुविधांबद्दल प्रशासनाकडून सामान्य नागरिक ते लोकप्रतिनिधींना अपेक्षा आहेत. अर्थसंकल्पात आर्थिक संकटातून बाहेर येण्यासाठी खर्चात कपात केली जाण्याची तरतूद असेल.(Saamana Editorial on Budget: केंद्रीय अर्थसंकल्प 2021 म्हणजे डिजिटल घोड्यांवरून स्वप्नांची सैर; सामना च्या अग्रलेखातून टीका)
तर 2020 हे संपूर्ण वर्ष कोरोनाशी लढा देण्यात गेले. कोरोनाच्या सुरुवातीला महापालिकेची आरोग्य सेवा ढासळली जात असल्याचे दिसून आले. उपनगरात आरोग्य सुविधांची कमतरता, डॉक्टरांसह आरोग्य कर्मचाऱ्यांची कमी दिसली. महापालिकेवर अशी वेळ ओढावली होती की त्यांना डॉक्टर्स ते वॉर्ड बॉय पर्यंतच्या लोकांना नियुक्त करावे लागले होते. या व्यतिरिक्त काही रुग्णालयात यंत्रणांचा अभाव ही दिसला. पण काही रुग्णालये ही फक्त कोविड19 च्या रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आली होती.
कोरोनाच्या काळात आरोग्य सुविधांचा दिसून आलेला अभाव दूर होईल आणि नवी आरोग्य योजना सुरु केल्या जातील अशी अपेक्षा महापालिकेच्या अर्थसंकल्पाकडून केली जात आहे. दरम्यान, 2019-20 च्या आर्थिक बजेटच्या तुलनेत वर्ष 2020-21 च्या बजेटमध्ये 3 टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले होते. तर 2019-20 मध्ये आरोग्यासाठी 4151 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. जी 2020-21 मध्ये 4560 कोटी रुपये केली होती.(Union Budget 2021: हे आत्मनिर्भर नाही तर, देशाला बरबादीकडे नेणारं अस्ताव्यस्त बजेट- उपमुख्यमंत्री अजित पवार)
वर्ष 2020-21 च्या बजेटमध्ये महापालिकेने कोरोना व्हायरसच्या विरोधात लढण्यासाठी 2 कोटी रुपयांची तरतूद केली होती. परंतु संपूर्ण वर्षात कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी महापालिकेने जवळजवळ 1600 कोटी रुपये खर्च केले आहेत. अशी शक्यता व्यक्त केली जात आहे की, यंदा बजेटमध्ये महापालिकेकडून अशा पद्धतीच्या महारोगाचा सामना करण्यासाठी आरोग्य क्षेत्रासाठी मोठी घोषणा करु शकते.