File Image Of Sanjay Raut | (Photo Credits: ANI)

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी काल (2 फेब्रुवारी) लोकसभेत अर्थसंकल्प 2021-22 मांडला. या अर्थसंकल्पानंतर अनेकांनी यामध्ये आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेवून तेथील राज्यांसाठी अधिक घोषणा झाल्याची बाब समोर ठेवली आहे. दरम्यान विरोधकांकडून या अर्थसंकल्पावर टीका झाली आहे. शिवसेनेचं मुखपत्र सामना मधूनही त्यावर हल्लाबोल करण्यात आला आहे. 'स्वप्नांची सैर' या मथळ्याखाली लिहलेल्या आजच्या अग्रलेखामध्ये डिजिटल घोड्यावरून सरकारने जनतेला स्वप्नांची सैर घडवून आणल्याचं म्हटलं आहे. Sanjay Raut Reaction on Budget 2021: हा अर्थसंकल्प देशाचा आहे की एखाद्या पक्षाचा आहे- संजय राऊत.

आर्थिक क्षेत्राचा आणि विकास दराचा आलेख हळूहळू खाली जात होता. वर जाण्याऐवजी आधी तो शून्याकडे आणि आता 'मायनस' कडे जात आहे. आर्थिक आघाड्यांवर असं भकास चित्र असताना केवळ वारेमाप आकड्यांची घोषणाबाजी करणं याला 'स्वप्नाळू' अर्थसंकल्पच म्हणायला हवा. दरम्यान एलआयसीचे आयपीओ येणार यावरून टीका करताना आता सरकारने विमा क्षेत्र देखील विकायला काढलं आहे. Union Budget 2021 Highlights In Marathi: इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही.

कोरोना काळात वाढलेली बेरोजगारी, डबघईला गेलेली अर्थव्यवस्था, बंद पडलेले उद्योगधंदे यावर उत्तर नाही. अर्थसंकल्पात त्याच अवाक्षरही नसल्याने सामान्य जनतेला काहीच दिलासा नाही. त्यामुळे संकल्प नसलेला हा 'अर्थसंकल्प' म्हणायचा कसा सवाल सामन्याच्या अग्रलेखात आज विचारण्यात आला आहे.

दरम्यान काल उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांनी अर्थसंकल्प 2021-22 मधून महाराष्ट्राला, देशाच्या आर्थिक राजधानीला काय मिळालं हा प्रश्नच आहे अशी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.