इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही 

 80 कस्टम ड्यूटी आता रद्द करण्यात आल्या आहेत. तर अजुन 400 जुन्या अशा प्रकारच्या कस्टम ड्युटींचा आढावा घेतला जात आहे. तर आगामी काळातही नवे कस्टम ड्युटीज देखील 2 वर्षांसाठी असेल. 

 पीएफ कापून अकाऊंट मध्ये वेळीच जमा होत नसेल तर कंपनी मालकाला मिळणारे फायदे मिळणार नाहीत. त्यामुळे कंपनी मालकांना वेळीच ते भरावे लागणार आहेत. 

5 कोटी पर्यंत उत्पन्न असलेल्यांचेच अकाऊंट ऑडिट केले जातील  पूर्वी ही मर्यादा 1 कोटी होती. 

75 वर्षावरील लोकांना जे केवळ पेंशन वर आहेत त्यांना आता टॅक्स रिटर्न भरण्यामधून मुभा देण्यात आली आहे.

कर दात्यांवर अधिकचा बोजा पडू नये याकडे सरकारचे लक्ष आहे. कॉर्परेट टॅक्स रेट जगातला सर्वात कमी भारतामध्ये आहे. यंदा टॅक्स रिटर्न भरणार्‍यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.  

वित्तीय तूट ही जीडीपी च्या  9.5% असेल अशी माहिती  निर्मला सीतारमण यांनी दिली आहे. 

आगामी जनगणना इतिहासातील पहिली डिजिटल जनगणना असेल. त्यासाठी विशेष आर्थिक तरतूद असेल. अशी माहिती त्यांनी दिली आहे. 

अर्थसंकल्प 2021-22 च्या वाचनादरम्यान मुंबई शेअर बाजारात उसळी बघायला मिळाली आहे.  

देशामध्ये एनजीओच्या माध्यमातून 100 नव्या  सैनिकी शाळा सुरू केल्या जातील. तसेच एकलव्य शाळा मागासवर्गीस विद्यार्थ्यांसाठी सुरू होतील. तसेच 10वी नंतरच्या शिक्षणासाठी दिल्या जाणार्‍या शिष्यवृत्तींमध्येही वाढ केली जाणार  

Load More

मोदी सरकारमधील तिसरं बजेट आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण लोकसभेमध्ये सादर करणार आहेत. 29 फेब्रुवारीला आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर झाल्यानंतर आता अर्थसंकल्पाकडे सर्वसामान्य आणि राजकीय मंडळींचं लक्ष लागलं आहे. या अर्थसंकल्पात आर्थिक, शिक्षण, आरोग्य, डिफेन्स अर्थात संरक्षण क्षेत्रासाठी काय घोषणा होणार? याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे. मोदी सरकारने 2020 मध्ये कोरोना संकटाचा सामना करता करता काही आर्थिक घोषणा केल्या होत्या. त्यानुसार रोजंदारी, मजूर लोकांना अन्नधान्याची सोय, बेरोजगारांना आर्थिक सहाय्यासासाठी काही घोषणा झाल्या होत्या मात्र आता यापुढे मोदी सरकार त्यामध्ये कोणत्या नव्या गोष्टींची भर टाकणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

भारतामध्ये यंदा पहिल्यांदाच पेपर लेस अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. त्यामुळे यंदा बजेटची कागदपत्र छापलेली नसतील. अर्थमंत्री निर्मला सीतारमण बजेट डिजिटली वाचून दाखवणार आहेत. Union Budget app खास लॉन्च करण्यात आले आहे. यामध्ये यंदाचा अर्थसंकल्प सामान्य जनता देखील पाहू शकते, डाऊनलोड करू शकते. यामध्ये हिंदी आणि इंग्रजी भाषेत माहिती उपलब्ध असे. हे अ‍ॅप अ‍ॅण्ड्राईड आणि आयओएस अशा दोन्ही भाषेत सपोर्ट करणार आहे.

दरम्यान यंदाचं बजेट कोविड 19 जागतिक आरोग्य संकटामुळे खास आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण सकाळी 11 वाजता लोकसभेत भाषणाला सुरूवात करतील. हे बजेट तुम्हांला डीडी दुरदर्शन, लोकसभा टीव्ही वर लाईव्ह पाहता येईल तसेच अर्थ मंत्रालय आणि केंद्रीय वृत्त विभागाच्या युट्युब चॅनेलवर देखील ते लाईव्ह असेल.