SSC Results 2021: निकालाची वेबसाईटच नाही तर ठाकरे सरकारही हँग झालंय; अतुल भातखळकर यांचा टोला
Atul Bhatkhalkar (Photo Credits: Twitter)

यंदाचा दहावीचा निकाल (SSC Results) आज दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात आला. मात्र निकाल साईटवरील विद्यार्थ्यांच्या गर्दीमुळे वेबसाईट क्रॅश झाली. त्यामुळे निकाल पाहता येत नसल्याने विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. यावरुन भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी सरकारवर टीका करण्याची संधी सोडलेली नाही. ठाकरे सरकारने विद्यार्थ्यांना मनस्ताप देण्याची सुपारीच घेतलीय, अशा शब्दांत भातखळकर यांनी सरकारला टोला लगावला आहे.

अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, "ठाकरे सरकार हँग झालंय.. त्यामुळे SSc च्या निकालाची वेबसाईट 'हँग'ली तर नवल ते काय? ठाकरे सरकारने विद्यार्थ्यांना मनस्ताप देण्याची सुपारीच घेतलेली दिसतेय..."

अतुल भातखळकर ट्विट:

यापूर्वी कोरोना संकटामुळे रखडलेल्या परीक्षा, निकाल यामुळे अनेक क्षेत्रातील विद्यार्थी त्रस्त होते. एमपीएससीचे विद्यार्थी देखील लांबलेल्या नियुक्त्यांमुळे त्रस्त आहेत. यावरुनच विद्यार्थ्यांना मनस्ताप देण्यासंदर्भातील वक्तव्य अतुल भातखळकर यांनी केले आहे. (Maharashtra SSC Result 2021: 10वीचा निकाल जाहीर; mahahsscboard.in वर तुमचे मार्क्स कसे पहाल ऑनलाईन?)

दरम्यान, दहावीच्या निकालाच्या दोन्ही वेबसाईट तब्बल 3-4 तासांपासून डाऊन झाल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालक त्रस्त झाले आहे. परंतु, या वेबसाईट्स अर्धा तासाने सुरु होतील, अशी महत्त्वपूर्ण माहिती राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिली आहे.