Maharashtra SSC Result 2021: 10वीचा निकाल जाहीर; mahahsscboard.in वर तुमचे मार्क्स कसे पहाल ऑनलाईन?
Maharashtra Board SSC Result 2021 | PC: File Image

Maharashtra Board SSC Result 2021: महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडून आज अखेर दहावीचा निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे. 10वी निकालाची बोर्डाने काही तासांपूर्वी माहिती देताना तो यंदा राज्यात 99.95% लागला असल्याचं स्पष्ट केले आहे. दरम्यान आता दुपारी 1 वाजल्यापासून विद्यार्थ्यांना विषयनिहाय त्यांचे दहावीचे मार्क्स, संपूर्ण निकाल result.mh-ssc.ac.in, किंवा mahahsscboard.in या दोन अधिकृत वेबसाईटवर पाहता येणार आहे. याकरिता विद्यार्थ्यांना रोल नंबर अर्थात आसन क्रमांक आणि आईचं नाव ही माहिती भरून निकाल पाहता येणार आहे.

यंदा कोरोनामुळे परीक्षा न घेता अंतर्गत मूल्यमापन पद्धतीने दहावीचा निकाल लावण्यात आला आहे. यामध्ये 9 वीच्या गुणांना 50 टक्के, अंतर्गत मूल्यमापनाला 30 टक्के आणि तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षांना 20 टक्के गुण देत बोर्डाने निकाल लावला आहे. या निकालावर खूष नसलेल्या विद्यार्थ्यांना श्रेणी सुधारण्यासाठी देखील एक संधी दिली जाणार आहे. असे बोर्डाने आज स्पष्ट केले आहे. Maharashtra Board SSC Result 2021: शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितला यंदाच्या 10वीच्या परीक्षा निकालाचा फॉर्म्युला; 11वी प्रवेशासाठी द्यावी लागणार वैकल्पिक सीईटी.

10 वीचा निकाल कुठे आणि कसा पहाल?

बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट वर तुम्हांला निकाल पाहता येणार आहे. यामध्ये निकालाच्या लिंक वर क्लिक करून तुमचा आसन क्रमांक स्पेस न देता आणि आईचं नाव टाकून निकाल पाहता येईल. हा निकाल विषयनिहाय आणि एकूण टक्केवारी असा असेल. तो डाऊनलोड करण्याची देखील सोय असणार आहे.

दरम्यान यंदा परीक्षा न झाल्याने अंतर्गत मूल्यमापन पद्धतीने पहिल्यांदाच निकाल लावण्यात आला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांची नापास झालेल्यांपेक्षा 90% वर गुण मिळवलेल्यांची संख्या अधिक आहे. विद्यार्थ्यांना दहावीच्या निकालानंतर 11 वी प्रवेशासाठी एक वैकल्पिक सीईटी परीक्षा देण्याचा पर्याय देखील देण्यात आला आहे.