Maharashtra SSC Result 2021 Declared: महाराष्ट्र बोर्डाचा यंदा दहावीचा निकाल 99.95%; कोकण विभागाचा सर्वाधिक 100% निकाल
10 वी बोर्ड निकाल (Photo Credits-File Image)

कोरोना संकटामुळे यंदा रद्द झालेल्या दहावी, बारावीच्या परीक्षांचा निकाल राज्य शिक्षण मंडळाने अंतर्गत मुल्यमापन पद्धतीने लावण्याचा निर्णय घेतला आहे. आज (16 जुलै) बोर्डाने एसएससी बोर्डाचा (Maharashtra SSC Board Result) निकाल लावला आहे. यामध्ये राज्याचा निकाल यावर्षी 99.95% लागला असल्याचे बोर्डाने स्पष्ट केले आहे. तर रिपिटर्स विद्यार्थ्यांचा निकाल 90.25 % लागला आहे. 9 विभागात आणि 8 माध्यमांमध्ये घेतल्या जाणार्‍या बोर्डाच्या परीक्षेमध्ये यंदा देखील कोकण विभागाने (Konkan Division) बाजी मारली आहे. कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल 100% तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे 99.84% लागला आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल दुपारी 1 वाजल्यापासून पाहता येणार आहे. Maharashtra Board SSC Result 2021: शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितला यंदाच्या 10वीच्या परीक्षा निकालाचा फॉर्म्युला; 11वी प्रवेशासाठी द्यावी लागणार वैकल्पिक सीईटी.

दरम्यान शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार यावर्षी निकालानंतर पुन्हा मार्क्स पडताळण्याची किंवा छायाप्रती घेण्याची मुभा नसेल. विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण http://result.mh-ssc.ac.in, http://mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

महाराष्ट्र बोर्ड 2021 दहावी निकालची वैशिष्ट्यं

एसएससी बोर्डाचा एकूण निकाल - 99.95%

रिपिटर्सचा निकाल - 90.25%

एकूण उत्तीर्ण मुली - 99.96%

एकूण उत्तीर्ण मुलं - 99.94%

100% निकाल - 27 विषयांचा

90% वर गुण असलेले विद्यार्थी - 5%

100% गुण मिळवलेले विद्यार्थी -957

दहावीचा निकाल ऑनलाईन कसा बघाल?

अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

दहावी निकालाच्या लिंक वर क्लिक करा.

तुमचा रोल नंबर आणि आईच्या नावाची 3 अक्षरं एंटर करा.

सबमीट करा. तुमचा निकाल स्क्रिनवर दिसेल.

एकूण आठ माध्यमानुसार सन 2020-21 वर्षातील एसएससी (इ. १० वी ) परीक्षेला एकूण १६ लाख ५८ हजार ६२४ विद्यार्थी बसल्याची नोंद झालेली आहे. यापैकी ९ लाख ०९ हजार ९३१ मुलं असून मुलींची संख्या ७ लाख ४८ हजार ६९३ एवढी आहे.