अलिबागच्या (Alibag) पांढर्या कांद्याला (White Onion) आता भौगोलिक निर्देशांक (Geographical Indication) देण्यात आल्याची माहिती केंद्र सरकार कडून देण्यात आली आहे. त्यामुळे लाल कांद्यासोबतच आता पांढर्या कांद्याला देखील महत्त्व वाढलं आहे. पांढरा कांदा त्याच्यामधील औषधी गुणधर्मांमुळे मागणीत आहे. पांढरा कांदा ह्रद्यविकार, कोलेस्ट्रेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी फायदेशीर आहे.
कृषी विभाग, कोकण कृषी विद्यापीठ, ग्रेट मिशन ग्रुप कन्सल्टन्सी यांच्या प्रयत्नाने 15 जानेवारी 2019 ला पांढऱ्या कांद्याच्या जीआय मानांकनासाठी नोंदणी करण्यात आली होती. अखेर 29 सप्टेंबर 2021 ला त्याला मान्यता मिळाल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. नक्की वाचा: White Onion Health Benefit: फक्त रोगप्रतिकार शक्तिच नाही तर केसगळती ही थांबते, पांढऱ्या कांद्याचे सेवन केल्याने होतात 'हे' आरोग्यदायी फायदे .
अलिबाग तालुक्यातील नेऊली, खंडाळे, कार्ले, वाडगाव अशा 8 विविध गावांमध्ये पांढर्या कांद्याची लागवड केली जाते. हा कांदा उन्हाळ्यातील दोन ते तीन महिनेच बाजारात विक्रीसाठी असतो. साधारणपणे फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला हा कांदा बाजारात दाखल होण्यास सुरुवात होते. अलिबाग परिसरातील शेतकरी भातशेती नंतरचे दुबार पीक म्हणून पांढऱ्या कांद्याचे मोठ्या प्रमाणात लागवड करत असतात. आता या कांद्याला जीआय टॅग मिळाल्याने देशासह जागतिक बाजारपेठेमध्ये स्थान मिळवणं शेतकर्यांना शक्य होणार आहे.