Rare Two-Headed Baby Shark: आतापर्यंत तुम्ही दोन डोके असलेले विविध प्राण्यांचे फोटो पाहिले असतील. विशेषत: सापांमध्ये दोन तोंडे असलेल्या अनेक प्रजाती आढळतात. परंतु, तुम्ही कधी दोन डोकी असलेला मासा पाहिला आहे का? महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील एका मच्छीमाराने (Fisherman in Palghar) 2 तोंडे असलेलं दुर्मिळ शार्क माशाचं पिल्लू (Two-Headed Baby Shark) पकडलं आहे. सातपाटी गावातील (Satpati Village) मच्छीमार नितीन पाटील याने आपल्या जाळ्यात हा छोटा मासा पकडला. या माशाच्या पिल्लाची दोन तोंडे पाहून तो काहीवेळ गोंधळला. त्यानंतर त्याने या दुर्मिळ शार्क माश्याच्या पिल्लाचे आपल्या मोबाईलमध्ये फोटो काढले आणि मासा पुन्हा समुद्रात सोडून दिला. सध्या सोशल मीडियावर या दुर्मिळ दोन तोंडी माशाच्या पिल्लाचे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत.
प्राप्त माहितीनुसार, शार्क माश्याचं हे पिल्लू केवळ सहा इंच होतं. त्याला दोन डोकी होती. माश्यांमध्ये ही अत्यंत दुर्मिळ प्रजात असून ती केवळ भारतातील काही ठराविक किनारपट्टीवरचं आढळून येते. सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूटच्या (Central Marine Fisheries Research Institute) तज्ज्ञांनी हिंदुस्तान टाईम्सला सांगितले की, शार्क माश्याला दुहेरी डोके असण्याची ही महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील पहिलीचं घटना असू शकते. (हेही वाचा - Cow Dung Chip: फोनमधून निघणारे रेडीयेशण कमी करते गाईच्या शेणापासून बनवलेली 'चिप'; राष्ट्रीय 'कामधेनु' आयोगाची माहिती)
two-headed #shark (dicephalic) recorded first time from #Maharashtra marine water. fisherman nitin patil from palghar, satpati found dicephalic Spadenose shark.
report - https://t.co/pq8zB94HPS@vidyathreya @SharkAdvocates @TheSharkStanley @akhileshkv7 @IUCNShark @anishandheria pic.twitter.com/fCIDXPd802
— Akshay Mandavkar🌿 (@akshay_journo) October 12, 2020
A #Fishermen in Maharashtra's Palghar district have spotted a unique two headed #shark yesterday while fishing in the arabian sea. pic.twitter.com/aqLEl1CeOb
— Aman Sayyad (@journo_aman) October 13, 2020
दोन डोकी असलेले साप आढळून येणं हे सामान्य आहेत. परंतु, दुहेरी डोक्याचा शार्क आढळण ही फारचं दुर्मिळ घटना आहे. डॉ. अखिलेश यांनी स्पष्ट केले की, अशा दुर्मिळ घटनेला अनेक प्राण्यांमध्ये दिसून येतात. हे भ्रूण विकृतीमुळे तयार होते. भारतीय किनारपट्टीवर अशा दोन-डोक्याचे शार्क दिसण्याच्या शेवटच्या घटनाची नोंद 1964 आणि 1991 मध्ये करण्यात आली होती.