Pune: अल्पवयीन मुलीला घरी बोलावून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी 50 वर्षीय आरोपीला अटक
Arrested | (File Image)

Pune: पुण्यातील वसतिगृहात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला आपल्या घरी बोलावून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याप्रकरणी एका 50 वर्षीय व्यक्तीला अटक (Arrest) करण्यात आली आहे. एवढेच नाही तर, हा व्यक्ती सलग दोन वर्षे तरुणीचे लैंगिक शोषण (Sexual Abuse) करत होता, तसेच शारीरिक संभोगाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत होता. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लॉरेन्स फॅन्सीस अँथनी (वय 50) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका वीस वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. ही संपूर्ण घटना एप्रिल 2019 ते सप्टेंबर 2021 दरम्यान मांजरी येथील आरोपीच्या घरी घडली. (हेही वाचा - Pune Shocker! गर्लफ्रेंड चिडली बॉयफ्रेंडशी भिडली, सुरीचा वार, 'तो' आयुष्यातून हद्दपार; तिच्या कृत्याने पुणे हादरलं)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी पुण्यातील एका शाळेत शिकत होती. ती एका वसतिगृहात राहायची. तर आरोपी लॉरेन्स हा त्याच वसतिगृहात काम करत होता. पिंपरी चिंचवड येथे नवीन वसतिगृह सुरू करून तिला तेथे हलविण्याच्या बहाण्याने आरोपीने पीडित मुलीला त्याच्या घरी नेले.

त्यानंतर आरोपीने पीडितेला घरातील कामे करण्यास भाग पाडले. एवढेच नाही तर पत्नी व मुले घराबाहेर गेल्यावर आरोपीने पीडित मुलीशी बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवल्यानंतर तो व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने तिच्यावर वारंवार बलात्कार केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सागर भापकर करीत आहेत.