Pune Shocker! गर्लफ्रेंड चिडली बॉयफ्रेंडशी भिडली, सुरीचा वार, 'तो' आयुष्यातून हद्दपार; तिच्या कृत्याने पुणे हादरलं

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीचे मृतकासोबत प्रेमसंबंध होते आणि दोघेही एकाच वर्गात शिकत होते. मृत मुलगा गेल्या काही महिन्यांपासून वाघोली परिसरात भाड्याच्या फ्लॅटवर राहत होता.

Pune Shocker! गर्लफ्रेंड चिडली बॉयफ्रेंडशी भिडली, सुरीचा वार, 'तो' आयुष्यातून हद्दपार; तिच्या कृत्याने पुणे हादरलं
Muder प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

Pune Shocker: पुणे जिल्ह्यातून अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेयसीनेने वाघोली (Wagholi) येथे वादातून 21 वर्षीय प्रियकराचा खून (Murder) केला. ही घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीचे मृतकासोबत प्रेमसंबंध होते आणि दोघेही एकाच वर्गात शिकत होते. मृत मुलगा गेल्या काही महिन्यांपासून वाघोली परिसरात भाड्याच्या फ्लॅटवर राहत होता.

आरोपी तरुणी रविवारी रात्री त्याच्यासोबत त्याच्या फ्लॅटमध्ये गेली होती. दोघांमध्ये काही मुद्द्यावरून भांडण झाले आणि त्यातून पुढे तरुणीने आपल्या प्रियकराचा खून केला. तरुणीने मृत मुलावर धारदार चाकूने वार केले. या घटनेत मुलगीही गंभीर जखमी झाली आहे. (हेही वाचा - Pune: उघड्यावर बसवलेल्या इलेक्ट्रिक डीपीच्या संपर्कात आल्याने 8 वर्षीय मुलीचा विजेचा धक्का, महावितरणच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे. पुढील तपशीलांची प्रतीक्षा होती. (हेही वाचा - Pune Fire: पुण्यातील आयटी पार्कच्या इमारतीला भीषण आग, अडकलेल्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु)

गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. दरम्यान, पुणे शहरातील आणखी एका गुन्हेगारी घटनेमध्ये 34 वर्षीय पुरुषाचा लग्नाचा प्रस्ताव नाकारल्यानंतर एका महिलेला छळाला सामोर जाव लागलं. आरोपीने पीडितेचे नग्न छायाचित्रे तिच्या कुटुंबासोबत शेअर केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेने आरोपीसोबत लग्न करण्यास नकार दिला. यामुळे संतापलेल्या आरोपीने पीडितेचा सतत पाठलाग करून तिच्यावर अत्याचार केला. आरोपीने पीडितेचे नग्न फोटो तिच्या बहिणीला पाठवून बदनामी केल्याचा आरोप आहे. आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

(The above story first appeared on LatestLY on May 29, 2023 01:56 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).