पुण्यातील (Pune) कल्याणीनगर परिसरातील आयटी पार्कच्या पाचव्या मजल्यावर आग लागल्याची घटना घडली आहे. या इमारतीत अडकलेल्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सध्या सुरु आहे. आगिमुळे धुराचे लोट हवेत दुरवर पसरले आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या असून नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु आहे. कल्याणीनगर येथील मारीगोल्ड आयटी पार्क येथे ही घटना घडली आहे. अग्निशमन दलाकडून उंच शिडीची ब्रॉन्टो व इतर चार अग्निशमन वाहने दाखल झाली आहेत. आग लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
पाहा व्हिडिओ -
पुण्यातील कल्याणीनगरला आयटी कंपनीत भीषण आग, कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू #Pune #firebrigade pic.twitter.com/Kl0mGFKYOi
— Lokmat (@lokmat) May 29, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)