Mumbai: अल्पवयीन मुलीला मिठी मारून विनयभंग केल्याप्रकरणी 41 वर्षीय व्यक्तीला 5 वर्षांची शिक्षा
Sexual harassment Representational Image | Rape | (Photo Credits: PTI)

Mumbai: अल्पवयीन मुलींवर लैंगिक गुन्ह्यांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्यांतर्गत नियुक्त केलेल्या विशेष न्यायालयाने 41 वर्षीय व्यक्तीला 8 वर्षीय अल्पवयीन मुलीला मीठी मारल्याप्रकरणी आणि विनयभंग केल्याप्रकरणी 5 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. पीडित मुलगी आरोपीच्या शेजारी राहत होती.

हा गुन्हा 2017 मध्ये घडला. प्राप्त माहितीनुसार, पीडिता संध्याकाळी 7.30 च्या सुमारास तिच्या घराजवळ खेळत होती आणि दोषीने तिला तिच्या नावाने हाक मारली. पीडितेला समजले की, तो तिला ओळखतो. त्यानंतर आरोपीने मुलीचा पाठलाग केला. तिथे त्याने पीडितेच्या नितंबांना स्पर्श केला आणि मिठी मारली. पीडितेने तेथून पळ काढत तिच्या आईकडे धाव घेतली आणि आईला घडलेला प्रकार सांगितला. आईने त्या माणसाचा शोध घेतला पण तो सापडला नाही. त्यानंतर तिने पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला शोधून काढले. त्यानंतर तक्रार दाखल करण्यात आली. (हेही वाचा -Bombay High Court On Driving: वाहन वेगाने हाकणे म्हणजे निष्काळीजपाणा आणि गुन्हा नव्हे- मुंबई उच्च न्यायालय)

विशेष न्यायाधीश प्रिया पी बनकर यांनी निकाल देताना सांगितले की, अशा केसेसमध्ये वाढ होत आहे जे आरोपीच्या अमानुष मानसिकतेचे प्रदर्शन करतात. "मुले लहान वय, शारीरिक असुरक्षितता आणि जीवन आणि समाजातील अननुभवीपणामुळे सहज शिकार होतात," असे न्यायालयाने म्हटले आहे.

पीडित मुलीवर, तिच्या कुटुंबातील सदस्यांवर आणि समाजावर या घटनेचा खूप विपरीत परिणाम होत आहे, असेही न्यायालयाने म्हटले आहे. घराजवळचा परिसरदेखील मुलांसाठी सुरक्षित नाही. निश्चितपणे, अशा घटनांमुळे लोकांच्या मनात दहशत निर्माण होते आणि याचा परिणाम दीर्घकाळ राहतो, असंही न्यायालयाने म्हटलं आहे.