
मुंबई (Mumbai) मध्ये आज कोरोना विषाणूच्या (Coronavirus) 917 रुग्णांची नोंद झाली आहे. यासह एकूण संक्रमितांची संख्या 1,25,239 वर पोहोचली आहे. शहरात आज 1,154 कोरोनाचे रुग्ण बरे झाले आहेत व आतापर्यंत 99,147 रुग्ण बरे झाले आहेत. आज शहरात 48 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत मुंबईमध्ये कोरोना विषाणूमुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या 6,890 झाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण बरेच वाढले आहे. त्यामुळे सध्या शहरामध्ये 18,905 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
आज मृत्यू पावलेल्या 33 रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. त्यातील 37 रुग्ण पुरुष व 11 रुग्ण महिला होत्या. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 3 जणांचे वय 40 वर्षाखाली होते, 25 जणांचे वय 60 वर्षा वर होते, तर उर्वरित 20 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते. सध्या मुंबई जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांचा दर 79 टक्के झाला आहे. 4 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर 0.79 टक्के राहिला आहे. 10 ऑगस्ट 2020 पर्यंत झालेल्या कोविडच्या एकूण चाचण्या 6.13.745 इतक्या आहेत. यासह मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर 88 दिवस झाला आहे.
एएनआय ट्वीट -
917 new #COVID19 cases and 48 deaths reported in Mumbai today. Total number of cases now at 1,25,239 including 99,147 recovered/discharged cases, 18,905 active cases and 6,890 deaths: Brihanmumbai Municipal Corporation (BMC) #Maharashtra pic.twitter.com/Hk2a2psIrl
— ANI (@ANI) August 11, 2020
प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून, 8 ऑगस्ट नुसार मुंबईमध्ये सक्रिय कंटेनमेंट झोन (झोपडपट्ट्या आणि चाळी) ची संख्या 591 आहे. यासह सक्रिय सीलबंद इमारती 5,415 आहे. दरम्यान, आज दिवसभरात महाराष्ट्रामध्ये 11,088 नव्या कोरोना व्हायरस संक्रमितांची नोंद झाली. यासोबत राज्यातील एकूण कोरोना संक्रमितांचा आकडा 5,35,601 इतका झाला आहे. यात रुग्णालयात प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या 1,48,553 आणि आतापर्यंत मृत्यू झालेल्या 18,306 जणांचाही समावेश आहे.