26/11 Mumbai Terror Attack 12th Anniversary: मुंबईत झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्यात शहीद झालेल्या 'या' शूरवीरांबद्दल अधिक जाणून घेत करुयात त्यांच्या कार्याला सलाम
Photo Credits- Twitter

26/11 Mumbai Terror Attack: देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 रोजी काही दहशतवाद्यांनी मिळून हल्ला करत गोळीबार केला होता. या घटनेचा जरी विचार केला तरीही अंगावर काटा उभा राहतो. मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात आली होती. पाकिस्तानातून भारतात आलेल्या 10 दहशतवाद्यांनी या दिवशी रक्ताच्या थारोळ्यात आपले वर्चस्व गाजवू पाहिले होते. यामध्ये 160 हून अधिक जणांचा मृत्यू झाला तर 300 पेक्षा अधिक जण जखमी झाले होते. मात्र यामध्ये मोलाचे कार्य बजावणाऱ्या काही शूरवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली तर काहीजण मृत्यूच्या दारातून परतले आहेत.(दहशहतवादी हल्ला ते कसाबची फाशी 'या' 11 गोष्टी मुंबईकरांच्या अंगावर आजही आणतात काटा!)

मुंबईत आलेल्या दहशतवाद्यांनी येथील नरीमन हाऊस, सीएसटी टर्मिनस, ताज हॉटेल आणि हॉटेल ट्रायडेंट ऑबेरॉयला लक्ष करत गोळीबार केला होता. तर 26 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर दरम्यानचे 66 तास हे भारतासाठी सर्वाधिक वाईट वेळ ठरली होती. तर यंदाच्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याला 12  वर्ष पूर्ण होत असून यामध्ये आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूरवीरांबद्दल येथे अधिक जाणून घेत त्यांच्या कार्याला ही सलाम करुयात.

>>एटीएस प्रमुख हेमंत करकरे, साळकर, कामटे यांना दहशवादी हल्ल्यात वीरमण

या सर्वांनी दहशतवाद्यांकडून करण्यात येत असलेल्या गोळीबारात आपल्या जीवाची पर्वा न करत आपले कार्य पार पाडले. तर दहशतवाद्यांना निर्भीड छातीने समोरे जाताना एटीएस प्रमुख हेमंत करकरे, एन्काउंटर स्पेशालिस्ट विजय साळसकर, एसीपी अशोक कामटे यांना वीरमरण आले. या सर्व अधिकाऱ्यांनी सीएसटी कामा हॉस्पिटलच्या येथे दहशतावाद्यांना अटक करण्यासाठी प्लॅनिंग करत होते. त्याचवेळी अजमल कसाब आणि त्याचा साथीदार इस्माइल कामा हॉस्पिटल मधून निघाल्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांवर अंधाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात करत मुंबई पोलिसांना मृत्यूच्या दारात नेऊन उभे ठेवले.

>>जखमी झालेल्या अरुण जाधव यांनी दिली होती कंट्रोल रुमला खबर

मुंबईत हल्ल्यातील हे तीन अधिकारी ज्या गाडीत बसले होते त्यामध्ये पोलीस कर्मचारी अरुण जाधव सुद्धा होते. दहशतवाद्यांनी हेमंत करकरे, विजय साळसकर, अशोक कामटे यांच्यासह अरुण जाधव यांच्यावर सुद्धा गोळीबार केला होता. मात्र ते थोडक्यात बचावले. त्यानंतर जखमी अवस्थेतच जाधव यांनी कंट्रोल रुमला कळवत हे तीन अधिकारी शहीद झाल्याचे सांगितले. त्याचसोबत जाधव यांनी कसाबसह इस्माइल हे दोघेजण पोलिसांची गाडी घेऊन चर्चगेटकडे निघाल्याची सूचना दिली होती.

>>हवालदार तुकाराम ओम्बले यांनी कसाबला पकडले होते जिवंत

या दोन्ही दहशतवाद्यांनी चर्चगेटकडे जाण्यासाठी जी पोलिसांची गाडी वापरली होती ती त्यांनी अर्धवट रस्त्यात सोडून एका कार मध्ये बसले. याच दरम्यान, जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार कंट्रोल रुम येथून शहीद हवालदार तुकाराम ओम्बले यांनी याची माहिती दिली होती की, ते चर्चगेटकडे जाण्यासाठी निघाले आहेत. त्यामुळे कंट्रोल रुमला माहिती मिळाल्यानंतर तुकाराम यांनी आपल्या साथीदारांसह गिरगाव चौपाटी येथे नाकाबंदी लावली. कसाबची गाडी तेथे पोहचताच तुकाराम हे त्यांच्या गाडीसमोर उभे राहिले. त्यावेळी त्यांनी कसाब याला जिवंत पकडले मात्र त्यांनी तुकाराम यांच्यावर गोळीबार केल्याने ते शहीद झाले. पण अन्य पोलिसांनी त्याचा साथीदार इस्माइल याला ठार मारले.

>>राकेश मारिया यांनी सांभाळली होती पोलिस कंट्रोल रुमची कमान

मुंबईतील दहशतवादी हल्ला थांबवण्यासाठी आणि लोकांचे प्राण वाचवण्यासाठी पोलीस आणि जवानांसह यामध्ये मोलाचे कार्य बजावणारे पोलीस ऑफिसर राकेश मारिया यांचा सुद्धा हात आहे. ते घटनास्थळी नव्हते. पण कंट्रोल रुममध्ये बसून वायरलेसच्या माध्यमातून दहशतवादी कुठे लपले आहेत आणि कुठून गोळीबार करतायत याची सातत्याने माहिती देत होते. असे म्हटले जाते की, जर राकेश मारिया यांनी कंट्रोल रुममध्ये बसून क्षणाक्षणाची माहिती दिली नसती तर पोलिसांसह सामान्य मुंबईकरांचे आणखी बळी गेले असते.

>>NGS कमांडो गजेंद्र सिंह बिष्ट आणि मेजर संदीप उन्नीकृष्णन यांना सुद्धा आले वीरमण

26 नोव्हेंबरच्या रात्री दहशतवाद्यांकडून सुरु असलेल्या गोळीबारामध्ये पोलीसांना त्यांच्यावर ताबा मिळवणे अशक्यच झाले होते. त्यामुळे घटनेच्या दुसऱ्याच दिवशी एनएसजीचे कमांडर यांनी यामध्ये आपले कार्य करण्यास सुरुवात केली. दहशतवाद्यांकडून गोळीबार आणि ग्रेनेड हल्ला सुद्धा केला जात होता. तर गजेंद्र सिंह बिष्ट आणि मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्यावर थेट गोळीबार केला गेल्याने ते शहीद झाले. मात्र यांच्यामुळे ताज हॉटेल दहशतवाद्यांच्या तावडीतून सोडवणे शक्य झाले होते.(11 years of 26/11 Terrorist Attack: या चार हिरोंनी वाचवले होते अनेकांचे जीव मात्र आज त्यांचे नावही जनतेला माहित नाही)

>>डॉग स्क्वॉड

मुंबईतील दहशवादी हल्ल्यादरम्यान चोख प्रतिउत्तर देत असताना मॅक्स सीजर, टायगर आणि सुल्तान नावाच्या कुत्र्यांनी 8 किलो आरडीएक्स, 25 ग्रेनेड, चार डेटोनेटर आणि अन्य काही हत्यारे जप्त करण्यास मदत केली होती. त्यामुळेच अनेकांची जीव वाचले गेले. सरकारने या तिघांना गोल्ड मेडल सुद्ध प्रदान केले.

>>कैप्टन रवि धर्निधिरका

मुंबईतील दहशतवादी हल्ल्यातील बहुतांश लोकांना माहिती आहे की, एनएसजी कमांडो किंवा मुंबई पोलिसांच्या मदतीने दहशतवाद्यांना ठार मारले होते. तसेच लोकांना सुद्धा वाचवले होते. लोकांना माहिती सुद्धा नसेल की, या दहशतवादी हल्ल्यात ताज हॉटेलमध्ये अडकलेल्या 157 लोकांना कॅप्टन रवि धर्निधिरका नावाच्या ऑफिसरने त्यांना वाचवले होते. युएस मरीन मध्ये कॅप्टन असलेल्या धर्निधिरका हल्ल्याच्या वेळी ताजच्या आतमध्ये एका रेस्टॉरंटमध्ये होते. त्यांना स्वत:हून दहशतवाद्यांसोबत लढायचे होते मात्र त्यांच्याकडे असलेली हत्यारे पाहून त्यांनी अडकलेल्यांना सुरक्षित बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर जळत असलेल्या हॉटेलच्या 20 व्या मजल्यावरुन 157 लोकांना सुखरुप बाहेर काढले. त्यांच्या या कामात दक्षिण अफ्रिकेचे दोन माजी कमांडर यांनी सुद्धा मदत केली होती.