26/11 Mumbai Terror Attack 11th Anniversary: दहशहतवादी हल्ला ते कसाबची फाशी 'या' 11 गोष्टी मुंबईकरांच्या अंगावर आजही आणतात काटा!
26/11 Mumbai Terror Attack (Photo Credits: PTI)

Mumbai Terror Attack 11th Anniversary: भारताच्या इतिहासातील हृदयद्रावक घटनांपैकी एक म्हणजे 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईत झालेला दहशतवादी हल्ला. 10 पाकिस्तानी दहशतवाद्यांनी समुद्रमार्गे येऊन देशाची आर्थिक राजधानी मुंबई येथे भीषण हल्ला केला. जणू काही मृत्यूचे तांडव डोळ्यांसमोर व्हावे अशा रूपात या हल्ल्यात तब्बल 197 जणांना आपले प्राण गमवावे लागले होते, तर 800 पेक्षा अधिक जण गंभीर जखमी होते. आज, या घटनेला तब्बल 11 वर्ष पूर्ण होत आहेत. याच निमित्ताने आपण दहशहतवादी हल्ल्यापासून ते दहशतवादी कसाबच्या फाशीपर्यंत घडलेल्या घटनाक्रमातील 11 लक्षात राहिलेल्या गोष्टी सांगणार आहोत.

26/11  हल्ल्यातील 11 लक्षात राहिलेल्या गोष्टी

-21 नोव्हेंबर रोजी पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्कर-ए- तोयबाचे दहा दहशतवादी अरबी समुद्र मार्गे भारतात यायला निघाले. या सर्व दहशतवाद्यांकडे अत्याधुनिक शस्त्रसाठा होता यातून मुंबई पोलीस व सर्व आड येणाऱ्या सुरक्षा रक्षकांना रोखून धरणे सहज शक्य होईल याची काळजी घेतली होती. तसेच शरीर थकू नये म्ह्णून या सर्वांनी ड्रग्स घेतले होते.

-अरबी समुद्रात कुबेर नामक भारताची एक बोट हायजॅक केली.आणि मुंबईपासून केवळ 7 किमी अंतर शिल्लक असताना त्यांनी बोटीच्या कप्तानला मारून स्पीडबोट मार्गे कुलाबा येथील मच्छिमार बंदर गाठले.

- यावेळी यातील चार जणांनी आपल्यासोबत आणलेल्या AK47 बंदुकीच्या गोण्या घेऊन कफ परेड येथील भादवार पार्क मध्ये प्रवेश घेतला. स्थानिक नागरिकांनी विचारणा करताच यांनी आपण विद्यार्थी असल्याचे सांगितले.

- मच्छिमार नगर येथे ज्या पहिल्या व्यक्तिने त्यांना पहिले त्यांनी लागलीच पोलिसांना याबाबत ,माहिती दिली मात्र तीन दिवसांपर्यंत ही सूचना पोलिसांनी नजरेआड केली. याकाळात या दहशतवाद्यांनी शहरात 25 परदेशी नागरिकांची हत्या केली.

- 26 नोव्हेंबर च्या दिवशी सकाळी 9.20 ला मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पहिला हल्ला करण्यात आला ज्यात तब्बल 58 जणांना जीव गमवावा लागला. इस्माईल खान आणि कसाब या दोघांनी एकहाती एक ते दीड तास सलग हा गोळीबार केला होता.

-विचित्र बाब अशी की कसाबला सीएसएमटी स्टेशनवर तिकीट नसल्याने टीसीने देखील पकडले होते.

-यांनतर अवघ्या आठ मिनिटातच नरिमन हाऊस परिसरात गॅस स्टेशन उडवून दुसरा हल्ला करण्यात आला होता. याबाबत पोलिसांना माहिती मिळते तोवरच Leopold Cafe येथे हल्ला करण्यात आला. याठिकाणी हल्ला करणारे शोएब आणि उमर हे दहशतवादी तिथूनच ताज पॅलेस येथे रवाना झाले आणि तिथून मुख्य मुंबई परिसरात बॉम्बहल्ला करण्यात आला.

-दहशतवाद्यांचे चौथे आणि शेवटचे लक्ष्य होते मुंबईतील Oberoi आणि Trident हॉटेल. याठिकाणी सुद्धा 9.35 ते 10 च्या दरम्यान हॉटेलमध्ये घुसून हल्ला झाला.दरम्यान, अजमल कसाब आणि याने कामा हॉस्पिटलवर देखील हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर दहशतवाद विरोधी पथक मुख्याधिकारी हेमंत करकरे यांची जीप हायजॅक करूनत्यांची हत्या करण्यात आली.

- गिरगाव चौपाटी जवळ कसाब आणि इस्माईल यांना पकडण्यात पोलिसांना यश आले. यावेळी तुकाराम ओंबळे यांनी कसाबची रायफल आपल्या हाताने धरून ठेवत त्याला पकडून ठेवले होते, यामुळे पोलिसांना त्याला पकडण्यात यश आले. दोन वर्ष कसाबला तुरुंगवास भोगावा लागला होता. 2010 मध्ये झालेल्या सुनावणीत त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आणि 2012 मध्ये पुणे येथील येरवडा जेल मध्ये त्याला फाशी झाली.

- कसाब हा जिवंत पकडला गेलेले एकमेव दहशतवादी होता. त्याला फाशी देण्याआधी त्याची शेवटची इच्छा विचारण्यात आली होती ज्यावेळी त्याने उच्च तर नाही मात्र अल्लाह कसम ऐसी गलती दोबारा नहीं होगी असे शेवटचे उच्चार काढले होते.

- कसाबच्या मृतदेहाला जवळच दफन करण्यात आले यावेळी मौलवींनी त्याच्यावर यथायोग्य धार्मिक अंतविधी केल्या.

26 /11 या हल्ल्यात आपल्या जीवावर खेळून मुंबई पोलीस व सुरक्षा दलांनी 9 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. तर अजमल कसाब याला जिवंत पकड्ण्यात पोलिसांना यश लाभले होते.  यामध्ये सहाय्यक उपनिरिक्षक तुकाराम ओंबळे, दहशतवाद विरोधी पथक मुख्याधिकारी हेमंत करकरे, ऍडिशनल पोलिस कमिशनर अशोक कामटे आणि एनकाउंटर स्पेशालिस्ट विजय साळसकर यांच्यासह 9 जणांना वीरमरण आले होते. दहशवाद्यांच्या हल्ल्यात प्राण गमावलेल्या सर्व नागरिक व पोलिसांना लेटेस्टली मराठी कडून भावपूर्ण श्रद्धांजली!