26/11 Terror Attack: 26/11 ला मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज 11 वर्ष पूर्ण झाली आहेत. एकूण 4 दिवस सुरु असणाऱ्या या थरारात 100 हून अधिक लोक मृत्युमुखी पडले. तसेच हजारोंच्या संख्येने लोक जखमी झाले होते. पण दुर्दैवाची गोष्टी म्हणजे या हल्ल्यात अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले. या हल्ल्यात असेही काही शूर चेहरे होते ज्यांना कधी प्रसिद्धी तर मिळालीच नाही पण त्याहीसोबत त्यांच्या नावाचा उल्लेख देखील झाला नाही.
पाहूया त्यांच्याबद्दल थोडी माहिती...
मैक्स, टायगर, सुलतान आणि सीझर ही त्यांची नावे आहेत. हे चारही श्वान मुंबई बॉम्ब शोधक पथकात काम करत होते आणि या चौघांच्या शूर कामगिरीमुळे अनेकांचे जीव वाचले.
मैक्स याचा जन्म 2004 साली झाला. त्याने पुणे येथे आपले ट्रेनिंग पूर्ण करून, तो एका वर्षात बॉम्ब शोधत पथकात कार्यरत झाला. आणि कौतुकाची बाब म्हणजे 26/11 च्या हल्ल्यात मैक्सने 8 किलो आरडीएक्स व 25 बॉम्बचा शोध घेतला होता. इतकंच नव्हे तर झवेरी बाजार येथील हल्ल्यात देखील मॅक्सने महत्वाची भूमिका बजावली. आणि म्हणूनच मॅक्सचा अमिताभ बच्चन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता.
तर सुलतान आणि टायगन यांची 26/11 च्या हल्ल्या दरम्यान ड्युटी ताज हॉटेल मध्ये होती तर सीजर हा नरीमन हाउस येथे कार्यरत होता.
त्यानंतर 2015 मध्ये हे चारही श्वान रिटायर झाले. मग त्यांना प्राणीप्रेमी विराज शाह यांनी दत्तक होते. परंतु आज ते चौघेही या जगात नाहीत. कारण एक एक करत त्या चारही शूरवीरांच्या मृत्यू झाले आहे.