कोरोना रुग्णावरील (Corona Patient) उपचारासाठी वापर होणाऱ्या औषधांची मागणी व उपलब्धतेतील तफावतीमुळे त्याचा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारींची अन्न व औषध प्रशासनाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून बनावट ग्राहकांद्वारे सापळा रचून रॅकेट शोधून काढण्याचा प्रयत्त्न केला जात आहे. राज्यात आतापर्यंत 4 कारवायांद्वारे 15 लोकांना अटक करण्यात आली आहे.
कोरोनावरील औषधांचा काळाबाजार होत असल्याची माहिती 23 जुलै रोजी प्रशासनाच्या ठाणे कार्यालयास मिळाली होती. उल्हासनगर 3 मध्ये एक महिला अक्टरमा 400 या औषधाची छापील किंमतीपेक्षा जास्त दराने विक्री करीत आहे. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी गुन्हा अन्वेषण युनिट 3, कल्याण पोलिस समवेत सापळा रचून उल्हासनगरमध्ये राहणाऱ्या निता पंजवानी यांना अटक केली. (हेही वाचा - कोकणातील प्रमुख रस्त्यांची डागडुजी तातडीने पूर्ण करा; सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे निर्देश)
#COVID_19 साठी वापर होणाऱ्या औषधांची मागणी व उपलब्धतेतील तफावतीमुळे त्याचा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारींची अन्न व औषध प्रशासनाकडून गंभीर दखल. बनावट ग्राहकांद्वारे सापळा रचून रॅकेट शोधून काढण्याचा प्रयत्त्न. आतापर्यंत ४ कारवायांद्वारे १५ लोकांना अटक. pic.twitter.com/tTZeV1G5bw
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 24, 2020
दरम्यान, सदर महिलेने औषध विक्री करताना रुग्णांचा कोविड अहवाल, डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन याची मागणी अथवा पडताळणी केली नाही. या प्रकरणी औषध निरीक्षक यांनी संबंधितांविरुद्ध भारतीय दंड संहिता, औषध व सौंदर्यप्रसाधने कायदे 1940 व जीवनावश्यक वस्तू कायदा अंतर्गत उल्हासनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत आहेत.
अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी अशा काळा बाजार करणारे विक्रेत्यांवर नजर ठेवून आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 4 कारवाया करून 15 लोकांना अटक करण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांनी औषधांचा काळाबाजार आणि वाजवी किमतीत विक्री करणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याच्या सूचनां दिल्या होत्या. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. रुग्णास औषधे छापील दरापेक्षा जास्त दराने विक्री होत असल्यास किंवा औषधाचा काळा बाजार होत असल्यास या बाबतची माहिती प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक 1800222365 / 022-26592362 या वर संपर्क साधावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाकडून करण्यात आली आहे.