Maharashtra 10th SSC Result 2023 Declared: महाराष्ट्र बोर्ड 10वीचा निकाल जाहीर; 'mahresult.nic आणि ssc.mahresults.org.in वर पाहता येणार मार्क्स
Representative Image (Photo Credit- PTI)

Maharashtra 10th SSC Result 2023 Declared: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च शिक्षण मंडळ (MSBSHSE) इयत्ता 10वी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. आज सकाळी 11 वाजता महाराष्ट्र मंडळ पुणे कार्यालयातून पत्रकार परिषदेद्वारे निकाल जाहीर करण्यात आला. मात्र, ऑनलाइन निकाल पाहण्याची लिंक दुपारी 1 वाजल्यापासून बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर लाइव्ह असेल.

उमेदवार बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in, sscresult.mkcl.org आणि msbshse.co.in वर जाऊनही निकाल तपासू शकतात. यावर्षी 02 मार्च ते 25 मार्च या कालावधीत बोर्डाच्या परीक्षा झाल्या. परीक्षेला बसलेल्या 15 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची बोर्डाच्या निकालाची प्रतीक्षा आज संपली आहे. (हेही वाचा - Maharashtra Board 10th SSC Result 2023: इयत्ता 10वी बोर्ड परीक्षा निकाल आज, mahahsscboard.in आणि mahresult.nic.in वर आसन क्रमांक आणि नावावरुन ऑनलाइन पाहा, डाऊनलोड करा रिजल्ट)

बोर्डाने निकाल जाहीर केल्यानंतर लगेचच महाराष्ट्र बोर्ड 10वी निकालाची लिंक साइटवर सक्रिय केली जाईल. ज्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र बोर्डाची दहावीची परीक्षा दिली आहे ते mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवरून निकाल पाहू शकतात. महाराष्ट्र बोर्डाचा 10वीचा निकाल 2023 तपासण्यासाठी विद्यार्थ्यांना रोल नंबर आणि आईचे नाव टाकावे लागेल. महाराष्ट्र एसएससी परीक्षा 2 मार्च ते 25 मार्च दरम्यान घेण्यात आली होती.

महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता 10वीचे 15 लाख विद्यार्थी त्यांच्या बोर्डाच्या निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. यावर्षी महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेसाठी 15,77,256 मुलांनी नोंदणी केली होती. महाराष्ट्र एसएससी बोर्डाच्या परीक्षेत 8,44,116 मुले आणि 7,33,067 मुली बसल्या होत्या.