महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचा महाराष्ट्र माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (SSC) निकाल 2 जून रोजी दुपारी 1 वाजता घोषित करणार आहे. महाराष्ट्र एसएससी 2023 चा निकाल अधिकृत वेबसाइट - mahresult.nic.in वर जाहीर केला जाईल. तसेच हा निकाल mahahsscboard.in वर देखील उपलब्ध असेल. विद्यार्थी या वेबसाइटवर त्यांचा निकाल रोल नंबर आणि नावानुसार ऑनलाइन माध्यमातून पाहू शकतात तसेच डाउनलोड करू शकतात. दरम्यान, महाराष्ट्र एसएससी 2023 चा निकाल नुकताच 25 मे 2023 रोजी जाहीर झाला.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा यंदाचा निकाल किती टक्के लागतो याबाबत उत्सुकता आहे. गेल्या वर्षी, महाराष्ट्र बोर्डाचा 10वीचा निकाल 17 जून 2022 रोजी दुपारी 1 वाजता जाहीर झाला आणि एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 96.94% होती. राज्यभरातील सुमारे 15 लाख विद्यार्थी महाराष्ट्रातील दहावीच्या निकालाची वाट दरवर्षी पाहत असतात. यंदाच्या वर्षी 2 मार्च ते 25 मार्च 2023 या कालावधीत एसएससी बोर्ड परीक्षा 2023 आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये 15 लाखांहून अधिक उमेदवार बसले होते. (हेही वाचा, Maharashtra SSC 10th Result 2023 Date: दहावीच्या निकालाची तारीख ठरली; निकाल लागायला काही तास बाकी)
निकालाची वाट पाहणारे सर्व उमेदवार आज त्यांच्या महाराष्ट्र एसएससी बोर्ड परीक्षेचा निकाल त्यांच्या रोल नंबर आणि आईच्या नावासह ऑनलाइन पाहू शकतात. निकाल ऑनलाइन प्रकाशित होताच संबंधित संकेतस्थळांवर जाऊन आपण हा निकाल पाहू शकता.
इयत्ता 10वीचा निकाल 2023 रोल नंबरसह कसा तपासायचा?
महाराष्ट्र बोर्डाच्या विद्यार्थ्यांनी त्यांचे MSBSHSE 10वीचे निकाल ऑनलाइन तपासण्यासाठी आणि डाउनलोड करण्यासाठी त्यांचा आसन क्रमांक वापरणे आवश्यक आहे. हा निकाल अधिक वेगाने जाणून घेण्यासाठी आपण खालील पायऱ्यांचा वापर करु शकता.
- mahahsscboard.in किंवा mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
- मुख्यपृष्ठावर, SSC परीक्षा 2023 निकालासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा
- तुमच्या स्क्रीनवर एक नवीन लॉगिन विंडो दिसेल.
- या नवीन लॉगिन पोर्टलमध्ये, तुमचा सीट नंबर आणि आईचे नाव प्रविष्ट करा आणि सबमिट करा.
- तुमचा 10वी एसएससी निकाल 2023 स्क्रीनवर दिसेल.
दरम्यान, महाराष्ट्र एसएससी निकाल 2023 ऑनलाइन तपासण्यासाठी आवश्यक बाबी पुढीलप्रमाणे- उमेदवाराचा आसन क्रमांक, आईचे पहिले नाव. विद्यार्थ्यांना आसनक्रमांक अथवा आईचे नाव शोधण्यात अडचण येत असेल तर विद्यार्थी आपले हॉल तिकीट पाहू शकता. अथवा ते त्यांच्या शाळेशीही संपर्क साधू शकतात.