Maharashtra SSC 10th Result 2023 Date: दहावीच्या निकालाची तारीख ठरली; निकाल लागायला काही तास बाकी
Representative Image (Photo Credit- PTI)

Maharashtra SSC 10th Result 2023 Date: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ महाराष्ट्र SSC 10 वीचा निकाल 2023 उद्या, 2 जून जाहीर करेल. 10 वी बोर्डाच्या परीक्षेला बसलेले उमेदवार mahresult.nic.in या महाराष्ट्र निकालाच्या अधिकृत साइटवरून निकाल पाहू शकतात. राज्यातील इयत्ता 10वी बोर्डाची परीक्षा 2 मार्च ते 25 मार्च 2023 या कालावधीत राज्यभरातील विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. यावर्षी सुमारे 14 लाख उमेदवारांनी परीक्षा दिली आहे.

एसएससी निकाल तपासण्यासाठी, विद्यार्थ्यांनी बोर्ड परीक्षेचा आसन क्रमांक आणि प्रवेशपत्र किंवा अर्जावर दिलेले आईचे नाव वापरणे आवश्यक आहे. खालील थेट लिंकच्या आधार तुम्ही तुमचा निकाल पाहू शकता. (हेही वाचा - High Court On Education Loan: विद्यार्थ्याचा CIBIL स्कोअर कमी असला तरी बँकांना शैक्षणिक कर्ज नाकारता येणार नाही- केरळ हायकोर्ट)

Maharashtra SSC Result 2023 Websites -

mahresult.nic.in

sscresult.mkcl.org

ssc.mahresults.org.in

MSBSHSE ने महाराष्ट्र SSC निकालासाठी पत्रकार परिषद घेणे अपेक्षित आहे. ज्यामध्ये उत्तीर्णतेची टक्केवारी, विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि इतर माहिती सामायिक केली जाईल. निकालानंतर निकालाच्या लिंक सक्रिय केल्या जातील.