Close
Search

World Snake Day 2021: जगातील 'हे' 5 विषारी साप जर चावले तर अवघ्या काही मिनिटात जाऊ शकतो जीव

जगभरात सापांच्या अनेक विषारी आणि प्राणघातक प्रजाती आढळतात, ज्या अत्यंत धोकादायक मानल्या जातात.वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या मते जगात सापांच्या 3 हजाराहून अधिक प्रजाती आढळतात, त्यापैकी 600 प्रजाती सर्वात विषारी मानल्या जातात, तर २०० हून अधिक प्रजाती वैद्यकीयदृष्ट्या महत्वाच्या मानल्या जातात

लाइफस्टाइल shubhangi salve|
World Snake Day 2021: जगातील 'हे' 5 विषारी साप जर चावले तर अवघ्या काही मिनिटात जाऊ शकतो जीव
साप/प्रतीकात्मक फोटो (Photo Credits: Reddit)

जागतिक सर्प दिन हा दरवर्षी 16 जुलै रोजी साजरा केला जातो. या दिवशी, जगभरात सापांविषयी असलेले प्रेम दर्शविण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते आणि त्यांच्याबद्दल जागरूकता निर्माण केली जाते.जगभरात सापांच्या अनेक विषारी आणि प्राणघातक प्रजाती आढळतात, ज्या अत्यंत धोकादायक मानल्या जातात.वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या मते जगात सापांच्या 3 हजाराहून अधिक प्रजाती आढळतात, त्यापैकी 600 प्रजाती सर्वात विषारी मानल्या जातात, तर २०० हून अधिक प्रजाती वैद्यकीयदृष्ट्या महत्वाच्या मानल्या जातात.अंदाजे आकडेवारीनुसार, दरवर्षी सुमारे 54 लाख लोक सापाच्या दंशाला बळी पडतात, तर विषारी सापांच्या दंशामुळे सुमारे 81,000 ते 1,38,000 लोक आपला जीव गमावतात. जागतिक सर्प दिनानिमित्त  जगातील 5 सर्वात विषारी सापांबद्दल जाणून घेऊयात. (World Snake Day: जागतिक सर्पदिनी IFS Parveen Kaswan यांनी सापांच्या 'विषारी'पणा बद्दल शेअर केली महत्त्वाची माहिती )

किंग कोब्रा 

किंग कोब्रा सापाचे नाव ऐकताच लोक थरथर कापू लागतात. वास्तविक, किंग कोब्रा हा पृथ्वीवरील सर्वात लांब आणि विषारी साप मानला जातो. असे म्हटले जाते की,हा साप चावल्यावर लकवा उत्प्रेरक न्यूरोटॉक्सिनची प्रचंड प्रमाणात निर्मिती होते.त्याचे विष इतके प्राणघातक आहे की हत्तीदेखील त्याच्या दंशामुळे मरतो. पूर्व, दक्षिण आणि दक्षिण-पूर्व आशियामध्ये या प्रजातीचे साप आढळतात.

सॉ-स्केल्ड वाइपर

वाइपर सापाच्या विभिन्न प्रजाती मध्ये सॉ-स्केल्ड वाइपर साप हा विषारी सापांच्या विविध

वाइपर सापाच्या विभिन्न प्रजाती मध्ये सॉ-स्केल्ड वाइपर साप हा विषारी सापांच्या विविध प्रजातींपैकी सर्वात विषारी आणि धोकादायक मानला जातो. या सापाच्या विषापासून मनुष्यांची सुटका होणे अशक्य आहे. सॉ-स्केल्ड वाइपर साप बहुतेक भारत, चीन आणि दक्षिण पूर्व आशियामध्ये आढळतात. जरी हे साप लांबीने लहान असले तरी ते खूप आक्रमक प्रवृत्तीचे आहेत. भारताबद्दल बोलायचे तर या प्रजातीच्या सापांनी चावा घेतल्यामुळे दरवर्षी 5 हजार मृत्यू होतात.

ताइपन  

विषारी सापांपैकी ताइपन हा सर्वात धोकादायक साप मानला जातो. त्याचे विष जगातील सर्वात विषारी आणि प्राणघातक मानले जाते. या सापाच्या चाव्याने 110 मिग्रॅपेक्षा जास्त विष तयार होते, जे 100 लोकांना किंवा 2.5 लाखांपेक्षा जास्त उंदीर मारण्यासाठी पुरेसे आहे. या प्रजातीच्या सापांची सर्वाधिक लोकसंख्या ऑस्ट्रेलियामध्ये आढळते. त्याच्या विषामध्ये आढळणारा न्यूरोटोक्सिन शरीरातील रक्त गोठवतो.

टाइगर 

टाइगर सर्प ही जगातील सर्वात विषारी प्रजातींपैकी एक मानली जाते. या प्रजातीचे साप बहुतेक ऑस्ट्रेलियामध्ये आढळतात. या सापांच्या विषामध्ये न्यूरोटॉक्सिक विष असल्याचे म्हटले जाते. जर हा साप एखाद्याला चावला तर त्याचा मृत्यू अवघ्या 30 मिनिटांपासून 24 तासांच्या आत निश्चित होतो. असे म्हणतात की, जेव्हा या सापांना पळून जाण्यासाठी जागा मिळत नाही तेव्हाच ते मनुष्यांना चावतात.

ब्लॅक मांबा 

आफ्रिकेत ब्लॅक मांबा साप आढळतो, ज्याची लांबी 14 फूटांपर्यंत आहे. विषारी व्यतिरिक्त, या सापाचे वैशिष्ट्य म्हणजे ते ताशी 20 किलोमीटर वेगाने धावू शकतात. एवढेच नव्हे तर परिस्थितीनुसार ते त्यांचा रंग बदलू शकतात आणि त्यांची प्रवृत्ती खूपच आक्रमक असते. ते त्यांच्या शिकाराला काही सेकंदात बर्‍याचदा चावू शकतात आणि जर हा साप एखाद्याला चावला तर तो 15 मिनिट ते 5 तासात कधीही मरु शकतो.

या पाच जातींचे साप जगातील सर्वात विषारी आणि प्राणघातक साप मानले जातात. ज्यांच्या दंशाद्वारे एखाद्या व्यक्तीचा पटकन मृत्यू होऊ शकतो. याशिवाय सापांच्या इतरही अनेक प्रजाती आढळतात, ज्यांना विषारी व प्राणघातक मानले जाते.

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change
Close
Latestly whatsapp channel