स्वातंत्र्यवीर सावरकर (फोटो सौजन्य-फेसबुक)

भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात बहुमोल वाटा असणारे वीर सावरकर (Veer Savarkar) म्हणजेच विनायक दामोदर सावरकर (Vinayak Damodar Savarkar) यांचे नाव मागील काही काळात देशाच्या राजकारणात सतत चर्चेत आहे. एकीकडे काही राजकीय पक्षांकडून सावरकर यांना भारतरत्न देण्याची मागणी होत असताना दुसरीकडे काहींकडून सतत लांच्छने लावण्यात येत आहेत, मात्र हे कितीही वाद असले तरी भारताच्या स्वतंत्र्यात सावरकर यांचे योगदान तर सर्वांनाच मान्य करावे लागेल असे आहे. अशा या वीर सावरकरांची येत्या 26 फेब्रुवारी रोजी पुण्यतिथी आहे. सावरकर यांच्या मृत्यूबाबत खास गोष्ट अशी की त्यांनी इच्छामरणाचा मार्ग स्वीकारला होता 1 फेब्रुवारी 1966 साली त्यांनी स्वतः निर्णय घेऊन आपले जेवण आणि औषध पाणी सोडून दिले आणि यामार्गे 26 फेब्रुवारी रोजी त्यांनी शरीर त्याग केला. स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथी निमित्त जाणून घ्या त्यांच्याबद्दल '10' खास गोष्टी

वीर सावरकर यांचा इच्छामरणाच्या निर्णयाचा दाखला हा त्यांच्या मृत्यूच्या दोन वर्षाआधी त्यांनी लिहिलेल्या 'आत्महत्या की आत्मसमर्पण' या पुस्तकात आढळून येतो. आत्महत्या आणि आत्मसमर्पण यात फरक आहे जेव्हा एखादा व्यक्ती आयुष्याला कणटालूं जीवन संपवतो तेव्हा त्याला आत्म्हत्या म्हणतात यातून निराशा दिसून येते. मात्र स्वतःच्या आयुष्याचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यावर जेव्हा जीवन संपवले जाते तेव्हा त्यात आनंद असतो आणि हा आत्म त्यागाचा भाग आहे. असे सावरकरांचे म्हणणे होते. याच न्यायाने भारत स्वातंत्र्याचा मूळ हेतू पूर्ण होताच सावरकर यांनी लिहिलेल्या शेवटच्या काही पत्रात सुद्धा त्यांनी इच्छामरणाची इच्छा व्यक्त केली होती.

वीर सावरकर यांच्या मृत्यू प्रमाणेच त्यांचे मृत्युपत्र ही मोठा चर्चेचा भाग ठरला होता. त्यांनी स्वतःच्या शरीराला विद्युत-चितेवरच जाळण्यात यावे. यांत्रिक शववाहिकेतूनच विद्युत – स्मशानात आपल्याला नेण्यात यावे माझ्या मृत्यूनिमित्त कोणीही आपली दुकाने किंवा व्यवसाय बंद ठेवू नयेत. कोणीही सुतक, विटाळ किंवा ज्यायोगे कुटुंबीयांना किंवा समाजाला निष्कारण त्रास होतो अशा कोणत्याही जुन्या रूढी पाळू नयेत किंवा पिंडप्रदान, त्या पिंडांना काकस्पर्श होईतो वाट पाहत बसणे इत्यादी कालबाह्य गोष्टी पाळू नयेत.असे सर्व मुद्दे त्यांनी आपल्या मृत्यूनाम्यात लिहून ठेवले होते. मीपणाचा छंद जडलेल्या आजच्या कालावधीत आत्मत्यागाचे उदाहरण ठरलेल्या अशा वीर सावरकर यांना पुण्यतिथीच्या निमित्त विनम्र अभिवादन!