Mahashivratri 2019: भारतात 'या' ठिकाणांवर आहेत भगवान शंकर यांच्या सर्वात मोठ्या प्रतिमा
Mahashivratri 2019: भारतात 'या' ठिकाणांवर आहेत भगवान शंकर यांच्या सर्वात मोठ्या प्रतिमा (Photo Credits-Facebook)

Maha Shivratri 2019: शिवरात्रीच्या उत्सावानिमित्त आपल्या घराजवळ किंवा परिसरात भगवान शंकराचे मंदिर असल्यास तेथे भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी होते. तसेच जर तुम्ही यंदा महाशिवरात्री निमित्त भगवान शंकराची प्रतिमा असलेल्या ठिकाणी भेट देण्यासाठी उत्सुक असाल तर यापूर्वी जाणून घ्या भारतात 'या' ठिकाणी शंकराच्या सर्वात मोठ्या आणि उंच प्रतिमा उभारण्यात आलेल्या आहेत. तसेच जगात सर्वात उंच भगवान शंकर यांची प्रतिमा नेपाळ मध्ये आहे.

नाथवाडा,राजस्थान

उदयपुर जवळ 50 किमी दूर अंतरावर श्रीनाथद्वारा येथे गणेश टेकडीवर भगवान शंकराची भव्य प्रतिमा उभारण्यात आली आहे. 351 उंच प्रतिमेचे दर्शन तुम्हाला 20 किमी अंतर दूर असूनही करता येऊ शकते.

मुरदेश्वरा शिव प्रतिमा, कर्नाटक

जगातिल सर्वात दुसरी भव्य प्रतिमा अरब सागराच्या तटावर स्थित मुरदेश्वर येथे शंकराची प्रतिमा उभारण्यात आली आहे. या ठिकाणी भगवान शंकराची प्रतिमा ध्यान करतानाच्या मुद्रेत उभारण्यात आली आहे. या भव्यदिव्य अशा प्रतिमेची उंची जवळजवळ 123 फुट आहे.

नागेश्वर महादेव, गुजरात

भारतात असलेल्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी 2 भगवान शंकर यांची गुजरात येथे ज्योतिर्लिंग आहे. त्यामधील पहिले म्हणजे सोमनाथ महादेव आणि दुसरे म्हणजे नागेश्वर महादेव. यापूर्वी मंदिर खूप मोठे नव्हते, मात्र टी-सिरिजचे निर्माता गुलशन कुमार यांनी या मंदिराला भव्य रुप दिले. मंदिर परिसाबाहेर शंकराची विशालकाय अशी 82 फुट उंचाची प्रतिमा उभारली आहे. या प्रतिमेत शंकर जप मुद्रा आणि वरदान मुद्रा स्वरुपात दिसून येतात.

आदियोग मंदिर,तमिळनाडु

तमिळनाडु मधील कोईबंटूर मध्ये 112 फूट उंच भगवान शंकराची मुर्ती पाहण्यासाठी जगभरातून लोक येतात. येथे एक डोळा बंद असलेल्या शंकराची अर्धी मुर्ती पाहायला मिळते. जी सर्वांपेक्षा वेगळी आणि खास आहे.

नामची शिव प्रतिमा, सिक्किम

सिक्किम मधील गंगटेक पासून 92 किमी दूर अंतरावर नामची शहराच्या टेकडीवर चारधाम बद्रीनाथ द्वारका, रामेश्वरम आणि पुरीच्या मंदिराची प्रतिकृती पाहायला मिळते. त्याचसोबत 12 ज्योतिर्लिंग ही या मंदिरात दाखवण्यात आली आहेत. येथील भगवान शंकराची मुर्ती 108 फूट उंच उभारण्यात आली आहे.

यंदा महाशिवरात्री 4 मार्च रोजी असणार आहे. मुख्य म्हणजे येणारी महाशिवरात्री ही सोमवारी आल्याने भगवान शंकराला सोमवार हा अत्यंत प्रिय असल्याचे सांगितले जाते. या दिवशी बेलाचे पान, चंदन,धुप, दीप, भांग, धतूरा आणि फुलांनी भगवान शंकराची पूजा केली जाते.