Railway | Image used for representational purpose | (फोटो सौजन्य-फेसबुक)

Special Trains For Christmas And New Year: दिवाळी झाली आता क्रिसमसच्या (Christmas) सुट्ट्या आणि नववर्षाच्या आगमनाचं सेलिब्रेशन (New Year Celebration) करणार्‍यासाठी कोकणात जाणार्‍यांना कोकण रेल्वेने (New Year Celebration) खूषखबर दिली आहे. येता सुट्टीचा काळ आणि पर्यटकाचा कोकणात जाण्याचा उत्साह पाहता आता पनवेल - मडगाव मार्गावर (Panvel and Madgaon) एक स्पेशल ट्रेन चालवली जाणार आहे. 22 नोव्हेंबर पासून ही ट्रेन प्रवाशांच्या सेवेत असणार आहे.

रेल्वे प्रशासनाकडून ही विकली स्पेशल ट्रेन पनवेल ते मडगाव दरम्यान पूर्ण आरक्षित स्वरूपात चालवली जाणार आहे. यामुळे क्रिसमस आणि न्यू इयरच्या काळात इतर रेल्वे वरील भार कमी केला जाईल आणि जास्तीत जास्त लोकांना कोकणात रेल्वेने जाता येणार आहे. नक्की वाचा: Aadhaar-IRCTC Linking : महिन्याला 12 रेल्वे तिकीटं बूक करण्यासाठी IRCTC सोबत लिंक करा Aadhaar; पहा irctc.co.in वर ऑनलाईन कसे कराल लिंक? 

01595 स्पेशल ट्रेन ही पनवेल मधून प्रत्येक सोमवारी सकाळी 6 वाजून 5 मिनिटांनी सुटणार आहे. तर मडगावला संध्याकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी पोहचणार आहे. ही ट्रेन 22 नोव्हेंबरपासून 3 जानेवारी 2022 पर्यंत धावेल. तर परतीच्या प्रवासाठी 01596 ही स्पेशल ट्रेन दर रविवारी मडगाव स्थानकातून संध्याकाळी 4 वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी 3 वाजून 15 मिनिटांनी पनवेल स्थानकात पोहचेल. ही ट्रेन 21 नोव्हेंबर पासून 2 जानेवारी 2022 पर्यंत चालवली जाणार आहे.

पनवेल ते मडगाव दरम्यान ही स्पेशल ट्रेन रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर रोड, रत्नागिरी,आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाली येथे थांबणार आहे.

दरम्यान 01595 या स्पेशल ट्रेन साठी 20 नोव्हेंबर पासून बुकिंग सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी www.irctc.co.in या अधिकृत वेबसाईटला किंवा रिझर्व्हेशन सेंटर्सवर प्रवाशांना तिकीटं उपलब्ध करून दिली जाणार आहेत.