आता भारतातील कोरोना संकट आटोक्यात आल्याची चिन्हं आहेत. त्यामुळे मागील दीड दोन वर्षांपासून घरात बंद असलेल्या अनेकांनी पर्यटनासाठी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. देशात विविध ठिकाणी भटकंती करण्याचा निर्णय अनेकांनी घेतला आहे. मअग तुम्ही देखील आयआरसीटीसी द्वारा रेल्वे तिकीट बूक करत बाहेर पडण्याचा निर्णय घेत असाल तर तुमच्यासाठी एक दिलासादायक बातमी आहे. IRCTC ने आता पर्यटकांच्या सोयीसाठी महिन्याला 12 तिकीटं बूक करण्याची मुभा दिली आहे. पण या साठी त्यांना आधार नंबर सोबत स्वतःला व्हेरिफाय करून घेणं आवश्यक आहे.
IRCTC च्या माहितीनुसार महिन्याला 6 तिकीटं बूक करण्यासाठी तुम्हांला आधार व्हेरिफिकेशनची गरज नाही. 6 पेक्षा अधिक तिकीटांसाठी आता प्रवाशांना आधार व्हेरिफाईड करावं लागणार आहे. त्यासाठी आधार केवायसी ऑप्शन 'माय प्रोफाईल' वर असेल. तसेच 6 पेक्षा जास्त तिकीटं घेतलेल्यांपैकी किमान एकाचं अकाऊंट आधार व्हेरिफाईड करून घेणं बंधनकारक आहे. नक्की वाचा: Sleeping Pods: लवकरच IRCTC मुंबई सेंट्रल येथे सुरु करणार स्लीपिंग पॉड्स सेवा; जाणून घ्या कोण कोणत्या सुविधा मिळणार.
IRCTC User ID सोबत Aadhaar व्हेरिफाय कसा कराल?
- www.irctc.co.in या अधिकृत संकेत स्थळाला भेट द्या.
- तुमचे लॉगिन क्रेडन्शिअल्स टाकून साईन इन करा.
- माय अकाऊंट टॅब मध्ये जाऊन लिंक युअर आधार हा पर्याय निवडा.
- आधार केवायसी पेज ओपन होईल. तेथे तुमचं नाव आधार कार्डाप्रमाणे टाका. आधार नंबर किंवा व्हर्च्युअल आय डी टाका. चेक बॉक्स सिलेक्ट करून सेंड ओटीपी वर क्लिक करा.
- तुमच्या मोबाईल वर आलेल्या ओटीपी चा नंबर टाईप करून व्हेरिफाय ओटीपी बटण क्लिक करा.
- आधार वरून तुमचा केवायसी रिस्पॉन्स घेतला जाईल. अपडेट वर क्लिक करा आणि तुमची आधार व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण करा.
- कन्फरमेशन मेसेज सोबत पॉप अप विंडो ओपन होईल. ती बंद करून पुन्हा www.irctc.co.in वर लॉगिन करा.
- IRCTC eTicketing website वर तुमच्या अकाऊंट टॅब मध्ये Aadhaar link वर Aadhaar KYC status तपासू शकता.
आधार सोबत पॅसेंजर व्हेरिफाय कसा कराल?
- www.irctc.co.in ला भेट द्या.
- माय प्रोफाईल मध्ये Add/Modify Master List वर क्लिक करा.
- तिथे तुम्हांला विचारण्यात आलेली सारी माहिती भरा.
- सबमीट बटण वर क्लिक करा.
- मास्टर लिस्ट मध्ये तुम्ही दिलेली माहिती अपडेट केली जाईल.
- आधार व्हेरिफिकेशन तपशील पाहण्यासाठी “Click here to check pending Aadhaar Verification Status”वर क्लिक करा. जर दिलेली माहिती जुळत असेल तर व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण केली जाईल. ती तुमच्या स्क्रिनवर दिसेल.
दरम्यान ही प्रक्रिया महिन्याला 12 तिकीटांसाठीच आहे. पूर्वीच्या नियमांनुसार 6 तिकीटांपर्यंत आधार व्हेरिफिकेशनची प्रवाशांना गरज्र नसेल.