PC:- (Ajanta Caves Wikimedia commons)

जगातील काही विशेष पर्यटन स्थळांना (Tourist Places) युनेस्कोकडून (UNESCO) जागतिक वारसास्थळांचा दर्जा (UNESCO WORLD HERITAGE SITES) देण्यात आला आहे. विशेष हे ठिकाणं बघण्यासाठी केवळ देशातील (National Tourism) नाही तर आंतरराष्ट्रीय पर्यटनास (International Tourism) चालना मिळते.  तसेच या स्थळांमुळे आपल्या देशाची (Nation), राज्याची (State), जिल्ह्याची (District) ओळख जगभरात अधोरेखीत होते. युनेस्कोकडून घोषित करण्यात आलेल्या राज्यातील पाच वास्तुंना जागतिक वारसास्थळांचा दर्जा देण्यात आला आहे. त्यात राज्यातील पर्यटन राजधानी औरंगाबादेतील (Aurangabad) अजिंठा लेणी (Ajanta Cave) आणि वेरुळ लेणी (Ellora Caves) तर मुंबईतील (Mumbai) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), एलिफंटा लेणी (Elephanta Caves) आणि व्हिक्टोरिया अर्ट डेको असेंम्बलचा (The Victorian and Art Deco Ensemble)समावेश आहे. पण आता या पाच पैकी फक्त तीनचं जागतीक वारसास्थळे राज्यात राहण्याची भिती व्यक्त केली जात आहे.  म्हणजेच युनेस्कोने जाहिर केलेल्या या यादीतून अजिंठा लेणी आणि वेरुळ लेणी वगळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुर्दैवाने असे झाल्यास राज्यातील पर्यटनास हा मोठा फटका असेल.

 

देशातीलचं नाही तर परदेशातील पर्यटक (International Tourist) देखील या लेणी बघण्यास येतात. पण तरीही जागतिक वारसास्थळाच्या यादीतून नाव वगळण्याची खुद्द भारतीय पुरातत्व सर्वेक्षणचे औरंगाबाद मंडळाचे अधिक्षक डॉ. मिलनकुमार चावले (Dr. Milind Kumar Chawale) यांनी चिंता व्यक्त केली आहे.  औरंगाबादेत आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलतांना त्यांनी ही भिती व्यक्त केली आहे. जागतिक वारसास्थळाचा मिळालेला दर्जा टिकवावा लागतो हा कायमस्वरूपी नसतो, असं सुचक वक्तव्य डॉ मिलनकुमार यांनी केलं आहे. (हे ही वाचा:- Mumbai Mandwa Water Taxi चे दर झाले स्वस्त; पहा Lower Deck, Executive Deck चा दर काय?)

 

यापूर्वी जागतिक वारसास्थळांच्या यादीतून तीन वारसास्थळे वगळण्यात आली आहे. वेरूळ-अजिंठा लेण्यात (Ajanta Ellora Caves) अपंगांची आर्थीक लुट, पाकीटमारी, चोऱ्या, थेट लेण्यात विक्रेत्यांचा प्रवेश याबाबत पर्यटकांच्या तक्रारी वाढत असल्याने अजिंठा आणि वेरूळ लेण्याचा जागतिक वारसा स्थळाचा दर्जा धोक्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळेत याबाबत दखल घेत आवश्यक ती उपाययोजना तातडीने करावी असं वक्तव्य डॉ मिलनकुमार यांनी केलं आहे.