प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Guy Kilty/Twitter)

सध्या लोकप्रिय असणाऱ्या दारुंपैकी बिअर (Beer)चे चाहते सर्रास आढळतात. अगदी कॉलेजला जाणाऱ्या मुलापासून ते ऑफीसमधील बोर्ड मिटिंगपर्यंत बिअरला बऱ्याच जणांची पसंती असते. बिअर तशी इतर अल्कोहोलपेक्षा स्वतही आहे, त्यामुळे ती परवडू शकते. अल्कोहोल असलेली प्रत्येक गोष्ट वाईटच, मात्र तुम्हाला माहित आहे नशेव्यतिरिक्तही प्रमाणात घेतलेल्या बिअरचे आपल्या शरीराला अनेक फायदे आहेत. बिअरमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन बी असते, खासकरून फिल्टर न केलेल्या बिअरमध्ये. बिअरमध्ये बी3, बी6 आणि फॉलिक अ‍ॅसिड असते, जे शरीसाठी उपयुक्त असते . चला तर जाणून घेऊया काय आहेत बिअर पिण्याचे फायदे

> ऊर्जा देते- प्रमाणात केलेल्या बिअरच्या सेवनाने शरीराला भरपूर प्रमाणात ऊर्जा मिळते. हृदय रोगांपासूनही बचाव केला जाऊ शकतो, सोबतच हार्ट अ‍ॅटकचा धोका कमी होतो.

> डायजेशनसाठी- बिअरमध्ये फायबरची मात्रा जास्त असते, त्यामुळे ते पोटाला आराम देते. तसेच पोट सहजपणे स्वच्छ होण्यासाठीही त्याचा फायदा होतो. बिअरच्या सेवनाने पाचन शक्ती वाढते.

> अनेक पोषक घटक उपलब्ध- बिअरमध्ये शरीराला आवश्यक असणारी, मॅग्नीशियम, सेलेनियम आणि पोटॅशियमसारखी पोषक घटक उपलब्ध असतात. त्याचबरोबर क्रोमियम, व्हिटॅमिन बी आणि बायोटिनसुद्धा असते. (हेही वाचा: तुम्हीही या गोष्टी फ्रीजमध्ये ठेवत असाल तर व्हा सावध)

> मधुमेह- बिअर पिल्याने टाईप 2 डायबिटीजचा धोका 30 टक्के कमी होतो. बिअरमध्ये होप्स नावाच्या कडू फुलाचा वापर केलेला असतो, ज्यामुळे अनेक प्रकारच्या रोगांवर नियंत्रण ठेवले जाते.

> त्वचेच्या समस्यांसाठी- चेहऱ्यावरील छिद्रांमध्ये जमा झालेली घाण दूर करण्यास बिअर मदत करते. यातील यिस्ट मुरुमांची समस्या दूर करतात. बिअर त्वचेवर लावल्यास इन्फेक्शन तसेच इतर समस्याही दूर होतात.

मात्र लक्षात ठेवा, अल्कोहोलचे प्रमाणाबाहेर सेवन केल्यास उच्च रक्तदाब, यकृताचे आजार, कर्करोग होण्याची दाट शक्यता आहे. तसेच मज्जासंस्थेशी संबंधित आजारांनाही अतिरिक्त मद्यसेवन निमंत्रण देऊ शकते.

(सूचना: या लेखाचा उद्देश फक्त माहिती देणे हा आहे, यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे.)