
जेव्हा दोन्ही पार्टनर एकमेकांच्या संमतीने लैंगिक संबंध (Sex) ठेवतात, तेव्हाच तो खऱ्या अर्थाने सेक्स मानला जातो. सेक्स दरम्यान पार्टनरची संमती (Sexual Consent) खूप महत्वाची मानली जाते. लैंगिक क्रियेतील संमती ही अशी गोष्ट आहे जी यापूर्वी प्रत्यक्षात चर्चेत किंवा वादविवादात नव्हती. आजच्या काळाप्रमाणे पूर्वी या विषयाबद्दल महिला किंवा पुरुष दोघांनाही इतकी माहिती नव्हती.
गेल्या काही वर्षांत आपल्या देशात बलात्कार आणि इतर लैंगिक अत्याचारामध्ये सातत्याने वाढ होत आहे. देशातील या वाढत्या घटनांमुळे लैंगिक संमती काय आहे आणि लैंगिक संबंधाबद्दल किती विचार केला पाहिजे या विषयावर चर्चा होणे फार महत्वाचे आहे.
सेक्सुअल कंसेंट म्हणजे काय?
जेव्हा बलात्कार किंवा लैंगिक हिंसा असे शब्द वापरले जातात, याचा अर्थ एखाद्या व्यक्तीस त्याच्या संमतीशिवाय किंवा परवानगीशिवाय लैंगिक क्रिया करण्यास भाग पाडले जाते. जोपर्यंत विवाहित किंवा अविवाहित महिला किंवा पुरुष, त्यांच्या स्वत: च्या संमतीनुसार लैंगिक क्रियेत गुंतत नाहीत तोपर्यंत त्याला एकमत संभोग म्हणता येणार नाही. जेव्हा संमतीने स्त्रिया आणि पुरुष शारीरिक संबंध ठेवतात तेव्हा ही गोष्ट चुकीची मानली जात नाही. परंतु जेव्हा त्या दोघांपैकी एकाचाही लैंगिक संबंधास नकार असेल, तर दुसर्या पार्टनरने त्याचा आदर केला पाहिजे आणि लैंगिक संबंधासाठी त्याच्यावर दबाव आणू नये.
पार्टनरची संमती का आवश्यक आहे?
असे बरेच घटक आहेत जे शारीरिक संबंध ठेवण्यास सहमत असतील की नाही हे निर्धारीत करतात. काही प्रकरणांमध्ये, बरेच लोक एखाद्या व्यक्तीसोबत डेटवर जातात आणि त्यांच्याबरोबर काही चांगले क्षण व्यतीत करतात. या दरम्यान, काही जोडपे परस्पर सहमतीने लैंगिक संबंध ठेवतात, मात्र काहीजण यासाठी सहमत नसतात. जर जोडीदार लैंगिक संबंधास सहमत नसेल तर त्याला त्यासाठी भाग पाडण्याऐवजी त्याचा इच्छेचा आदर केला पाहिजे.
दुसर्या एका सामान्य उदाहरणाप्रमाणे, जेव्हा दोन व्यक्तींपैकी एकाने मद्यपान केले असेल, तर त्याच्याशी नशेत असताना लैंगिक संबंध ठेवणे गैर नाही असेही वाटू शकते. मात्र अशी परिस्थिती कोणत्याही व्यक्तीस लैंगिक छळ करण्याचा अधिकार देत नाही. (हेही वाचा: Hot Oral Sex Tips: योनीची चव सुधारण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात या गोष्टी; ओरल सेक्समध्ये जोडीदाराला मिळेल दुप्पट आनंद)
अशी अनेक प्रकरणे ऐकली किंवा पाहिली असतील, जेव्हा मुलांना लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडले जाते. विशेषतः 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या अल्पवयीन मुलीस आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तीशी लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडणे गुन्हा आहे.
कठोर कायदे -
बलात्कार, लैंगिक छळ आणि लैंगिक हिंसाचाराच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी, सरकारने कठोर कायदे केले गेले आहेत. असे असूनही, लैंगिक हल्लेखोरांना काही फरक पडत नाही किंवा लैंगिक संमती म्हणजे काय हे त्यांना माहिती नाही. अशा परिस्थितीत प्रत्येकाला त्यासंबंधीचे कायदे आणि हक्क माहित असणे आवश्यक आहे, जेणेकरून बलात्कार, लैंगिक हिंसाचार यांसारखे गुन्हे करणा-या आरोपींना सर्वात कठोर शिक्षा मिळेल.
(वरील मजकूर हा प्राप्त माहितीवर आधारीत आहे. या गोष्टी अंमलात आणण्याआधी आपल्या जोडीदाराशी बोलून त्याची संमती घ्या. लेटेस्टली मराठी या लेखाची पुष्टी करत नाही)