Cut Fruits (Photo credits: Needpix)

योनीची (Vagina) चव ही कप केकसारखी वाटणे शक्य आहे? अजिबात नाही. याबाबत आपल्या जोडीदारानेही अशी अपेक्षा करू नये. परंतु जर का आपले प्रायव्हेट पार्टस आपण स्वच्छ आणि निरोगी ठेवत असाल तर तुमच्या पार्टनरला त्याची चव नक्कीच आवडेल. म्हणजेच सेक्स (Sex) करताना तुमचा जोडीदार जर का तुमचा प्रायव्हेट पार्ट लीक करत असेल, तर तुम्हाला व तुमच्या पार्टनरला नक्क्कीच आनंद मिळेल. कधी कधी तुमच्या योनीची चव ही शरीराला येणारा घाम तसेच तुम्ही वापरत असलेली डिटर्जंट पावडर यांच्यावरही अवलंबून असते.

मात्र आपण जे खातो त्यावरही तुमच्या योनीची चव आणि तुमच्या पार्टनरचा आनंद अवलंबून ठरू शकतो. त्यामुळे जर का तुमच्या पार्टनरने जास्त काळासाठी तुमच्या योनीची चव चाखावी असे तुम्हाला वाटत असेल, तर तुमच्या प्रायव्हेट पार्टचा सुगंधही महत्वाचा आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशा  काही गोष्टी सांगत आहोत ज्या खाल्ल्याने तुमच्या प्रायव्हेट पार्टची चव सुधारू शकते.

अननस -

तुमची योनी अम्लीय आहे, म्हणून अननस किंवा संत्री किंवा द्राक्षाची फळे खाल्ल्याने तुमच्या योनीतील नाजूक असलेली पीएच पातळी संतुलित होण्यास मदत होते. त्यामुळे योनीतून स्त्रवणारा स्त्राव थोडा गोड लागतो. जर एका फळाबद्दल विचाराल तर यासाठी अगदी डोळे बंद करून अननस हा पर्याय निवडू शकता.

दालचिनी -

तुम्हाला याआधी दालचिनी जास्त आवडत नसली, तरी आत्ता ती आवडू शकेल. दालचिनी आपल्या योनीची आम्लयुक्त चव कमी करू शकते, तसेच यीस्टच्या संसर्गावर उपचार म्हणूनही तिचा उपयोग होऊ शकतो. दालचिनी खाल्ल्याने तुमच्या योनीची चव दालचिनीसारखी बनत नाही, तर योनिमार्गाचे संतुलन चांगले राहते. म्हणजेच चांगला वास आणि आनंददायी प्रणय.

ओवा वनस्पती  -

भाजी किंवा कोशिंबीर बनवण्यासाठी उपयुक्त अशी एक वनस्पती किंवा पदार्थ म्हणून ओव्याकडे पहिले जाते. मात्र आपल्या योनीत असलेली कडू चव कमी करण्यासाठीदेखील ओवा उपयोगी ठरू शकतो. यामध्ये व्हिटॅमिन सी असते, जे योनीच्या जीवाणूंच्या पर्यावरणास पुनर्संचयित करण्यासाठी अपवादात्मकपणे चांगले कार्य करते. जर तुमच्या योनीला अत्यंत दुर्गंधी येत असेल तर आपण ओव्याच्या देठाचा वापर करू शकता. मात्र तरीही काही फरक पडला नाही तर डॉक्टरांचा सल्ला घेणे उपयुक्त आहे.

क्रॅनबेरी -

हा बेरीचा हंगाम आहे म्हणून या काळात आपण जितक्या शक्य होतील तितक्या क्रॅनबेरी खा. कारण आपल्या मूत्रमार्गाच्या प्रणालीतील जीवाणूंचा प्रतिकार करण्यास नैसर्गिकरित्या त्या मदत करतात. तसेच  क्रॅनबेरी योनीची पीएच पातळी संतुलित ठेवण्यास मदत करतात. (हेही वाचा: Sex Tips: 'या' कारणांमुळे कमी होऊ शकते महिलांची लैंगिक इच्छाशक्ती; वेळीच काळजी घेतली नाही तर नात्यात येऊ शकतो दुरावा)

दही –

दही नैसर्गिकरीत्या तुमच्या योनीची चव संतुलित ठेवतात. दररोज एक वाटी दही घेतल्याने आपल्या योनीच्या आसपासच्या जागी बॅक्टेरियांचा धोका उद्भवत नाही. यामुळे तुमची योनी फ्रेश राहते.

जर आपणही आपल्या योनी चव चांगली ठेवू इच्छित असाल, तर रेड मीट, मासे आणि जंक फूडपासून दूर रहा. असे पदार्थ आपल्या योनीची चव खारट आणि कडू करू शकतात.

(सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे. यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे. लेटेस्टली मराठी या मजकूराची पुष्टी करत नाही )