Sex Tips: 'या' कारणांमुळे कमी होऊ शकते महिलांची लैंगिक इच्छाशक्ती; वेळीच काळजी घेतली नाही तर नात्यात येऊ शकतो दुरावा
प्रातिनिधिक प्रतिमा (File Image)

नाते टिकवून ठेवून ते वृद्धिंगत करण्यामध्ये सेक्स (Sex) या गोष्टीचे फार मोठे योगदान आहे. मात्र कधी कधी स्त्री अथवा पुरुष यांच्यामधील सेक्स करण्याची इच्छा कमी होते, ज्याचा थेट परिणाम नात्यावर होतो. स्त्रियांमध्ये मोठ्या प्रमाणावर ही समस्या दिसून येते. स्त्रियांमध्ये सेक्सची आवड कमी झाल्यामुळे हार्मोनल चेंजेस, नोकरीचा ताण, नातेसंबंधातील तणाव इत्यादी उद्भवू शकतात. लैंगिक संबंधात कमी होणारी आवड ही वैद्यकीय भाषेत हायपोएक्टिव सेक्शुअल इच्छा डिसऑर्डर (Hypoactive Sexual Desire Disorder) म्हणून ओळखली जाते.

नुकत्याच झालेल्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, 18 ते 59 वर्ष वयोगटातील जवळजवळ एक तृतीयांश महिला सेक्समध्ये रस नसल्यामुळे त्रस्त आहेत. पुरुषांची सेक्सची इच्छा कमी होणे यामागे इरेक्टाइल डिसफंक्शन हे महत्वाचे कारण असू शकते. मात्र मानसिक आणि शारीरिक अशा दोन्ही कारणांमुळे महिलांना सेक्स बाबतीत समस्या उद्भवतात, ज्या औषधांमुळे ठीक होऊ शकत नाहीत. तर आज आम्ही स्त्रियांमध्ये सेक्सची इच्छा का कमी होते याबाबत काही कारणे सांगत आहोत. एकदा का गोष्टीचे मुळ समजले की त्यावर उपयोजना करणे सोपे ठरते.

कमी झोप -

2015 साली जर्नल ऑफ सेक्सुअल मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, ज्या स्त्रिया योग्य झोप घेतात, त्यांचे लैंगिक जीवन चांगले असते. तसेच त्या लैंगिक संबंधाबद्दल अधिक उत्साही असतात. त्यामुळे आपणही आपला सेक्स ड्राइव्ह वाढवू इच्छित असल्यास, किमान आठ तास झोप घेणे आवश्यक आहे.

नातेसंबंधातील समस्या -

जोडीदारासोबत ताणलेले संबंध स्त्रीमधील सेक्सची इच्छा कमी करू शकतो. एक खराब नातेसंबंध लैंगिक जीवनावर परिणाम करतो. जर आपल्या महिला जोडीदाराला सेक्समध्ये इच्छा नसेल, तर तिच्याशी बोलून यावर उपाययोजना करा.

औषधांचा परिणाम -

काही अशी औषधे आहेत जी सेक्स ड्राईव्ह कमी होण्यास कारणीभूत ठरू शकतात. डिप्रेशनच्या गोळ्या, रक्तदाब गोळ्या किंवा गर्भनिरोधक गोळ्या अशी औषधे कामवासना कमी करतात. आपणही अशी औषधे घेत असल्यास, याबद्दल आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्याऐवजी सुरक्षित औषधांचा पर्याय निवडा.

कामाचा तणाव -

पत्नीची सेक्सबद्दलची आवड संपत असण्यास कामाचा ताण हेदेखील एक कारण असू शकते. गृहिणी असो वा नोकरी करणारी स्त्री, स्त्रीवर नेहमीच कामाचा दबाव आणि ताण असतो. अशा परिस्थितीत आपल्या पत्नीच्या कामात तिला थोडी मदत करा. (हेही वाचा: Delivery नंतर Sex Life चा पुरेपूर आनंद घेण्यासाठी वापरा या Tips; स्त्रियांना मिळेल परमोच्च आनंद, पुरुषही होतील खुश)

भावनिक कारणे -

स्त्रियांमध्ये सेक्स ड्राइव्ह कमी होण्याचे एखादे भावनिक कारणदेखील असू शकते. मूड स्विंग असणाऱ्या महिलांमध्ये ही समस्या खूप सामान्य आहे. याचे एक कारण शरीरात होणारे हार्मोनल बदल हे देखील असू शकते. याबद्दल आपल्या जोडीदाराशी बोला आणि आवश्यक असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

(सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे. यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे. लेटेस्टली मराठी या मजकूराची पुष्टी करत नाही )