प्रातिनिधिक प्रतिमा (संग्रहित संपादित प्रतिमा)

अनेक जोडप्यांमध्ये प्रचंड उत्साहाने सुरु झालेली सेक्स लाईफ (Sex Life), अवघ्या काही काळात एका ठराविक उंचीपर्यंत पोहचते. मात्र स्त्री जोडीदाराच्या गरोदरपणात सेक्स लाईफ जवळजवळ संपल्यातच जमा होते. मुलाच्या जन्मानंतर, जोडप्यांच्या लैंगिक जीवनाबद्दल मोठी चिंता असते. आपले लैंगिक जीवन पुन्हा व्यवस्थित सुरु होईल ना ही भीतीही जोडप्यांच्या मनात असते. प्रसूतीनंतर सामान्यत: काही दिवसांत सर्व काही ठीक होईल, असे डॉक्टरांचे म्हणणे असते. म्हणून त्याबद्दल काळजी करण्याची आवश्यकता नाही. फक्त थोडी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. तर प्रसुतीनंतर लैंगिक जीवन सुखी, आनंदी कसे ठेवावे याबद्दल आम्ही काही टिप्स देत आहोत.

शरीर पूर्णतः बरे होण्यास वेळ द्या –

प्रसुतिनंतर स्त्रीचे शरीर पूर्णपणे बरे होण्यासाठी सुमारे सहा आठवडे लागतात. यानंतर, शारीरिक संबंध ठेवणे योग्य आहे. हा कालावधी संपल्यावर एकदा डॉक्टरांना भेटा आणि तुमची सेक्स लाईफ पुन्हा सुरु करा.

घाई करू नका -

स्त्रियांमधील लैंगिक इच्छा कमी होण्यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे त्यांच्या योनीतील वेदना हे आहे. प्रसुतिदरम्यान, योनी अधिक मोठी करण्यासाठी ती कट केली जाते आणि नंतर टाके घातले जातात. योनीची रिकव्हरी पुन्हा होऊपर्यंत स्त्रीला वेदना जाणवतात. त्यामुळे घाई न करता या वेदना पूर्णतः कमी होऊपर्यंत थांबा.

जन्म नियंत्रण योजना आखा -

जर आपण नुकतेच एका प्रसुतीचा अनुभव घेतला असेल, तर पुन्हा लगेच प्रसूत होणे ही योग्य गोष्ट ठरणार नाही. त्यामुळे हे लक्षात ठेवा की, जरी आपली मासिक पाळी नियमितपणे सुरू झाली असली तरी, पुन्हा गर्भधारणा होण्याचा धोका अजूनही आहे. त्यामुळे सेक्स करताना योग्य ती काळजी घ्या.

ल्युब्रिकेशन वापरा –

कधीकधी प्रसूती नंतर महिलांनाही सेक्स करण्याची इच्छा निर्माण होते. अशावेळी दोघांमध्येही प्रचंड आवेग असतो. मात्र महिलांचे शरीर त्यांना साथ देत नाही. अशावेळी त्यांच्यावर जबरदस्ती करणे योग्य नाही. मात्र महिला जोडीदार कम्फर्टेबल असेल तर एका चांगले ल्युब्रिकेशन वापरून तुम्ही सेक्स करण्याचा प्रयत्न करू शकता.

काही वेळ एकत्र व्यतीत करा -

सेक्स केवळ शारीरिक क्रिया नसून तिथे भावनांचे योगदानही तितकेच महत्वाचे आहे. म्हणून प्रसूतीनंतर, सेक्स सुरू करण्यापूर्वी एकमेकांसोबत काही चांगला वेळ व्यतीत करणे गरजेचे आहे. आई बनल्यानंतर बर्‍याच वेळा स्त्रियांना नैराश्य येते, म्हणून पुरुषांनी त्यांच्यासोबत राहून त्यांना मानसिक आधार देणे गरजेचे आहे. (हेही वाचा: Sex Benefits: जाणून घ्या दररोज सेक्स करण्याचे काही आश्चर्यकारक आरोग्यदायी फायदे)

वैद्यकीय सल्ला घेण्यास अजिबात संकोच करू नका -

प्रसूतीनंतर लगेच स्त्रिया सेक्ससाठी तयार नसतात, त्यामुळे त्यांच्या शरीराला आणि मनाला आराम द्या. यासाठी त्यांना बाहेर कुठेतरी फिरायला घेऊन जा. स्त्रीचे मन रमेल अशा गोष्टी करा. यामुळे स्त्रिया पुन्हा उत्साहित होऊन सेक्स लाईफ लवकर सुरु होईल. इतके करूनही सेक्सचा उत्साह वाटत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

(सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे. यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.)