Image For Representations (Photo Credits: File Image)

सेक्स (Sex) हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे, ज्याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही. आपण विवाहित असाल किंवा अविवाहित असला, सेक्सबद्दलचे आकर्षण जवळजवळ प्रत्येक जीवात असते. म्हणूनच लैंगिक संबंधांच्या आश्चर्यकारक आरोग्य फायद्यांविषयी आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. सेक्स केवळ समाधान आणि आनंदच देत नाही, तर एक चांगला सेक्स हा आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. एका संशोधनात असे दिसून आले आहे की, लैंगिक संबंधादरम्यान आपले शरीर मेंदूत एक केमिकल कंपाऊंड सोडते, जे आपल्या शरीराला आराम देते.

संशोधनात म्हटले आहे की, दररोज सेक्स केल्याने शरीराला बरेच फायदे होतात. दररोज संभोग केल्याने बरेच रोग बरे होतात, तणावाची पातळी कमी होते आणि कॅलरी देखील बर्न होतात. त्यामुळे जी जोडपी कधीतरीच सेक्स करतात त्यांच्यासाठी हा लेख कदाचित उपयुक्त ठरू शकतो. चला पाहूया रोज सेक्स केल्याने नक्की काय फायदे होतात.

भावनिक तीव्रता वाढते -

लैंगिकतेचा अर्थ केवळ शारीरिक जवळीक नसून, दोन जोडीदारांमधील भावनिक संबंध मजबूत करणे हा आहे. सेक्स त्यासाठीच मदत करतो. कोणतेही नातेसंबंध व्यवस्थित टिकण्यासाठी रोज सेक्स करणे महत्वाचे आहे.

हृदय निरोगी राहते -

नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार, आठवड्यातून दोनदा सेक्स करणार्‍या पुरुषांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी असते असे दिसून आले आहे. एका महिन्यात दोन किंवा त्याहून कमी वेळा लैंगिक संबंध ठेवणार्‍या पुरुषांना हृदयविकाराचा त्रास वाढू शकतो.

रोगप्रतिकार शक्ती वाढते -

दररोज सेक्स केल्याने इम्यून-बूस्टिंग इम्युनोग्लोबुलिन ए (एलजीए) ची पातळी वाढते, ज्यामुळे आपले शरीर सर्दी आणि ताप यासारख्या आजारांविरुद्ध लढण्यासाठी सक्षम बनते.

तणाव मुक्ती होते -

ऑफिसमधील आणि कौटुंबिक ताणामुळे तुमच्या लैंगिक जीवनावर परिणाम होऊ देऊ नका. सेक्स केल्याने तुमची मनःस्थितीच चांगली होते. एका संशोधनात असे सिद्ध झाले आहे की, जे लोक सतत सेक्स करतात ते तणावापासून दूर असतात आणि सुखी आयुष्य जगतात.

वेदना कमी होतात -

जर डोकेदुखी हे लैंगिक संबंध न ठेवण्याचे निमित्त असेल तर तसे करणे थांबवा, त्याऐवजी सेक्स हा केला पाहिजे. जेव्हा आपण ऑर्गेझमला (Orgasm) पोहोचता, तेव्हा हार्मोन ऑक्सीटोसिन (Hormone Oxytocin) हा संप्रेरक पाच पट वाढतो आणि हे एंडोर्फिन (Endorphin) डोकेदुखी किंवा कोणत्याही प्रकारच्या वेदना काढून दूर करण्यास मदत करते.

वयोमर्यादा वाढते -

परमोच्च आनंद मिळाल्यावर, एक संप्रेरक सोडला जातो, याला डीहायड्रोएपिएन्ड्रोस्टेरॉन (Dehydroepiandrosterone) म्हणतात. हे रोग प्रतिकारशक्ती वाढवते, ऊतींची दुरुस्ती करते आणि त्वचा निरोगी ठेवते. आठवड्यातून दोनदा संभोग करणारे पुरुष आठवड्यातून एकदा सेक्स करणार्‍या पुरुषांपेक्षा जास्त आयुष्य जगतात.

रक्ताभिसरण वाढते -

संभोग करताना हृदयाची गती वाढते, ज्यामुळे शरीराच्या पेशींमध्ये नवीन रक्त पुरवठा होतो आणि वापरलेले रक्त काढून टाकले जाते. यावेळी शरीरातून काही विषारी घटक देखील बाहेर पडतात, ज्यामुळे आपल्याला थकवा जाणवतो.

नीट झोप येते -

सेक्सनंतर शरीर थकते व शांत झोप लागते, ज्यामुळे उठल्यावर शरीर खूप निवांत होते. चांगली झोप आपल्याला ताजेतवाणे आणि सतर्क ठेवते. (हेही वाचा: पहिल्यांदा सेक्स करताय? त्रासदायक ठरू शकतो First Time Sex चा अनुभव; वेदना टाळण्यासाठी वापरा या सोप्या टिप्स)

शरीराची तंदुरुस्ती वाढते -

आपल्याला जिममध्ये जाणे किंवा वर्कआउट करणे आवडत नसल्यास फिट राहण्यासाठी सेक्सचा फायदा होऊ शकतो. अर्ध्या तासाच्या लैंगिक संबंधामुळे तुमची 80 कॅलरी बर्न होते आणि तुमची वेस्टलाइनही बारीक होण्यास मदत होते.

इस्ट्रोजेन आणि टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढते -

पुरुषांमधील टेस्टोस्टेरॉन संप्रेरक त्यांना बेडवर उत्कट बनवते. यामुळे फक्त चांगला सेक्सच होत नाही तर, आपले स्नायू आणि हाडेदेखील बळकट होतील. चांगला सेक्स हे तुमचे हृदय निरोगी ठेवते तसेच कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवते. दुसरीकडे, स्त्रियांमधील इस्ट्रोजेन हार्मोनही त्यांना हृदयरोगापासून वाचवते.

दिवसभर फ्रेश वाटते –

एका संशोधनानुसार, सकाळी लैंगिक संबंध ठेवणारे लोक दिवसभर तणावातून मुक्त राहतात. दिवसभर त्याचा मूडही खूप चांगला असतो. लैंगिक संबंधानंतर निर्माण झालेले हॅपी हार्मोन्सन दिवसभरातील समस्यांशी लढण्याची ताकद देते.

(सूचना: वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे. यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही.)