Sex संदर्भात काय सांगते आयुर्वेद? कोणत्या ऋतूमध्ये सेक्स करणे योग्य आणि अयोग्य? वाचा आश्चर्यचकीत करणाऱ्या तथ्यांबद्दल अधिक
प्रतीकात्मक फोटो (Photo Credits: Unsplash)

आपल्या समाजात सेक्स ( Sex) फक्त कुटुंब वाढवण्यासाठी केले जाते अशीच समजूत दिली जाते. अशा परिस्थितीत, आयुर्वेदाचा हा विश्वास आपल्याला आश्चर्यचकित करतो की लैंगिक संबंध फक्त मुले होण्यासाठी केले जात नाहीत. आयुर्वेदानुसार सेक्स आपले पोषण आणि विकास करतो, म्हणून आपण वेळोवेळी सेक्स करत रहावे. आयुर्वेदानुसार सेक्स करण्यासाठी काही मूलभूत नियम आहेत. आज आपण आयुर्वेदात सेक्सचे गूढ नियम किंवा अर्थांच्या गोष्टी जाणून घेणार आहोत.  (Sex After 60: सेक्स करण्यासाठी वयाचे बंधन असते? वयाच्या साठीनंतर शरीरसंबंध ठेवावेत? काय सांगतात तज्ज्ञ )

शरीरातून उत्पादित होणारा ओजस काय आहे ?

आयुर्वेद आपल्याला सांगतो की, आपले शरीर 7 महत्त्वपूर्ण आणि मूलभूत धातूंच्या संयोगाने बनलेले आहे. त्यापैकी एक म्हणजे धातूरस आपण याला सार किंवा सीरम म्हणतो, जे प्रत्यक्षात रक्त चे श्वेत स्वरूप असते. या रसाने एक द्रव पदार्थ येतो, ज्याला आपण शुक्र धातू म्हणतो. त्यांना बनवण्याच्या प्रक्रियेस सुमारे एक महिना लागतो. शुक्र धातू हे प्रत्यक्षात सुधारित रूप आहे. लैंगिक द्रवपदार्थ तयार करण्यासाठी शरीराला कठोर परिश्रम करावे लागतात. या द्रवपदार्थापासून आणखी एक जाड रस तयार होतो ज्याला ओजस म्हणतात. आयुर्वेदानुसार ओजस नवीन जीवनाची रचना निर्माण करण्यात महत्वाची भूमिका बजावते.

लैंगिक उर्जा कधी प्रभावित होते?

आपल्या लैंगिक ऊर्जेवर परिणाम करणारा आणखी एक घटक आहे, ज्याला 'अपान वायु' म्हणतात. हे लक्षात घेण्यासारखे आहे की आपले शरीर ज्या पाच प्रकारच्या हवेपासून बनलेले आहे, त्यापैकी एक म्हणजे 'अपान वायु', जो शरीराच्या खालच्या भागात स्थित आहे. हा वायु हा शरीराचा एक महत्त्वाचा घटक आहे, जो मासिक पाळी, प्रजनन क्षमता आणि ऑर्गज्म नियंत्रित करतो. जर 'अपान वायु'ची हालचाल निरोगी असेल तर ती आपली मुळे अबाधित ठेवते. (Sex Tips: तुमच्या सेक्स लाइफ ला बूस्ट करण्यासाठी 'या' खाद्य पदार्थांचे सेवन करा )

ऑर्गज्म हानिकारक आहे का?

इंटरनेटवर संभोग सुखासंदर्भात पाहिले जातात, फायद्यांना मोठे करुन सांगितले जाते. पण आयुर्वेदानुसार काही विशिष्ट परिस्थितीत ऑर्गज्म मानवी शरीरासाठी चांगली नसते. याचे मुख्य कारण म्हणजे संभोगानंतर आपल्या शरीरात वात दोष निर्माण होतो. ज्यामुळे आपल्याला शारीरिकदृष्ट्या कमकुवत वाटते.वात दोष शुक्र धातूचे नुकसान करते, ज्याला शरीरात तयार होण्यास एक महिन्यापेक्षा जास्त वेळ लागतो, ज्यामुळे ओजसची प्रक्रिया मंदावते. जे प्रत्यक्षात आपल्याला ऊर्जा देते.

आयुर्वेदानुसार सेक्स करण्याची योग्य वेळ कोणती?

साधारणपणे लोकांना रात्री सेक्सचा जास्त आनंद घ्यायला आवडतो. पण आयुर्वेदानुसार रात्री सेक्स करणे योग्य नाही. आयुर्वेदामध्ये सकाळी सूर्योदयानंतर आणि 9 किंवा 10 वाजण्यापूर्वी सेक्स करण्याचा सर्वोत्तम वेळ आहे. यासह सेक्ससाठी सर्वोत्तम ऋतु हिवाळा किंवा वसंत ऋतु असल्याचा आयुर्वेद सल्ला देते. कारण वातदोषाची प्रवृत्ती उन्हाळी हंगामात जास्त असते. म्हणून या दिवसांमध्ये सेक्स आणि ऑर्गज्म ची फ्रिक्वेंसी किमान असावी.

कोणत्या ऋतूमध्ये किती वेळा आणि का सेक्स करावे ?

शारीरिकदृष्ट्या सशक्त लोकांनी वसंत ऋतू आणि हिवाळ्यात आठवड्यातून तीन ते पाच वेळा सेक्स करणे आवश्यक आहे. या ऋतूंमध्ये लैंगिक क्रिया कमी करून शरीरात निर्माण होणारा ओजसचा रस व्यर्थ जातो. तथापि, उन्हाळ्याच्या हंगामात आठवड्यातून एक किंवा दोन वेळा फक्त सेक्स करण्याचा प्रयत्न करा.

( सुचना - वरील सर्व लेख केवळ माहितीच्या आधारावर लिहिण्यात आलेला आहे. )