प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Pexels)

आपण अनेकदा लग्न झालेल्या जोडप्यांकडून त्यांची लाईफ किती नीरस झाली आहे असे अनेकदा ऐकतो. याला कारण एका व्यक्तीसोबत अनेक वर्षे एकत्र राहिल्यानंतर एकमेकांचा सहवास काही काळानंतर कंटाळवाणा वाटू लागतो. असे वाटणे स्वाभाविक आहे. लग्नानंतर पती-पत्नीमधील नात्यांत अनेक चढ-उतार येतात. कामाचे टेन्शन, कौटुंबिक समस्या यामुळे अनेकदा पती-पत्नीमधील ताणतणाव वाढू लागतात. परिणामी त्यांची सेक्स लाईफवर (Sex Life) त्याचा वाईटरित्या परिणाम होऊन ती रसहिन वाटू लागते आणि कालांतराने ती कमी होऊ लागते.

या नीरस झालेल्या सेक्स लाईफला तुम्हाला पुन्हा एकदा आधीसारखे रोमांचक बनवायचे असेल तर काही ठराविक गोष्टी करणे गरजेचे आहे. कंटाळवाणी झालेले आपले वैवाहिक आयुष्य पुन्हा रोमांटिक बनविण्यासाठी अनेक जोडपी पहिल्यासारखे डेटिंग करण्यावर भर देतात. ज्यामुळे हे रटाळ झालेले वैवाहिक जीवन पुन्हा हेल्थी बनावे. ज्याचा परिणाम हळूहळू तुमची सेक्स लाईफही रोमांचक आणि थ्रिलिंग बनेल. ती तशी बनावी यासाठी पुढील गोष्टींची काळजी घ्या.

1. आपल्या पार्टनरसह फ्लर्ट करा: अनेकदा आपल्या पार्टनरने आपल्यासोबत मस्करी केलेली, फ्लर्ट केलेले फार आवडते. यामुळे तुमच्या नात्यात आलेला कडवटपणा कमी होऊन गोडवा निर्माण होण्यास मदत होईल.हेदेखील वाचा- Winter Sex Tips: थंडीत सेक्स करताना 'या' गोष्टी ठेवा ध्यानात ज्या वाढवतील तुमच्या शरीरातील उष्णता, मिळेल Orgasm चा अनुभव

2. चांगले हेल्थी सेक्स: सेक्स दरम्यान फोरप्ले, सेक्स टॉईज, फ्रूट्स, चॉकलेट सॉस, वाईन, BDSM यांसारख्या गोष्टींचा वापर करुन तुमची सेक्स लाईफ थोडी रोमांचक बनवा. ज्यामुळे तुम्हाला ऑर्गेज्मचा आनंद मिळेल.

3. पुन्हा एकदा कनेक्ट आणि रिबिल्ड करा: लग्नाआधी तुम्ही आणि तुमचा जोडीदार हे दोन वेगवेगळे लोक होते. लग्नानंतर तुमच्यामध्ये बदल होतो. अशा वेळी तुमच्या इच्छा, अपेक्षा, विचार, भविष्याबाबत एकमेकांशी बोलणे गरजेचे आहे. ज्यामुळे तुम्ही एकमेकांशी कनेक्ट होतात. ज्यामुळे तुमचे नाते तुम्ही नव्याने जगाल.

4. केमिस्ट्री वा इंटीमसी वर काम करा: इंटिमसी चा अर्थ केवळ सेक्शुअल केमिस्ट्री असे नाही. यात भावनात्मक, मानसिक आणि बौद्धिक अंतरंगता यांचा देखील समावेश आहे. त्यामुळे एकमेकांशी भावनिक अटॅचमेंट असणे तुम्हाला एकमेकांच्या अधिक जवळ आणते.

या सर्व गोष्टी जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात अनुभवाल तेव्हाच तुमचे नाते तुम्ही नव्याने जगाल आणि तुमची सेक्स लाईफ सुद्धा खूप रोमांचक आणि थ्रिलिंग बनेल.

(टीप- या लेखात दिलेली माहिती ही प्राप्त माहितीनुसार आहे. या माहितीची लेटेस्टली मराठी पुष्टी करत नाही.  म्हणून लेखात दिलेल्या कोणत्याही टिप्स किंवा सूचना अवलंबताना डॉक्टरांचा सल्ला घ्या.)