Winter Sex Tips: थंडीत सेक्स करताना 'या' गोष्टी ठेवा ध्यानात ज्या वाढवतील तुमच्या शरीरातील उष्णता, मिळेल Orgasm चा अनुभव
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credit : youtube)

थंडीत सेक्स (Sex) करणे हा प्रत्येक जोडप्यासाठी रोमांटिक अनुभव असतो. बाहेरील थंड वातावरणामुळे आलेला गारवा आणि त्यात सेक्स मुळे शरीरात निर्माण होणारी उष्णता हा अनुभव अंगावर शहारा आणणारा असतो. सेक्स दरम्यान शरीरात जास्त उष्णता निर्माण झाली तरी हरकत नाही. कारण बाहेरील गार झालेले वातावरण अंगातील उष्णता चांगली मानवते. थंडीत आलेल्या गारव्यामुळे कुणाच्याही तरी अंगाची ऊब मिळावी, आपल्या जोडीदाराच्या घट्ट मिठीत राहावे असे अनेकांना वाटत असते. सेक्स दरम्यान एकमेकांचे अंग एकमेकांवर घासल्यामुळे देखील ही उष्णता निर्माण होते. हा अनुभव खूपच सुखावह असतो.

त्यामुळे थंडीत केलेला सेक्स हा खूपच रोमांच असतो. थंडीत अंगाला घाम येत नाही, त्यामुळे सेक्स दरम्यान मिळणारा हा आनंद हा अजून द्विगुणित होतो. त्यामुळे जर कुणाला गर्भधारणा करायची असेल तर हा मौसम सर्वात उत्तम आहे. कारण थंडीत आपल्याला दीर्घकाळ सेक्स करण्याची इच्छा होते. त्याशिवाय या दरम्यान सेक्स केल्यास शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.हेदेखील वाचा- Sex Tips For Men: महिलांना सेक्स दरम्यान बेडवर कोणत्या गोष्टी हव्याहव्याशा वाटतात? वाचा सविस्तर

थंडीत सेक्स दरम्यान घ्यावयाची काळजी

  • थंडीत सेक्स करताना शक्यतो पायात मोजे घालावे. बाहेरील गार वातावरणामुळे पायांची बोटे खूप लवकर गार पडतात. त्यामुळे संभोगाची इच्छा ब-याचदा होत नाही. त्यामुळे पायात मोजे घातल्याने पायाची बोटे गरम होतात. शरीरात देखील उष्णता निर्माण होण्यास मदत होते.
  • सेक्स दरम्यान अंगावर पांघरूण, जाड ऊबदार ब्लँकेट घेतल्यास देखील सेक्स दरम्यान परमोच्च सुखाचा अनुभव मिळतो. कारण संभोगादरम्यान पुरुष व स्त्री हे नग्नावस्थेत असल्यामुळे पांघरूण किंवा ब्लँकेटमुळे अंगाला ऊबदारपणा मिळतो. ज्यामुळे सेक्स करण्याची इच्छा आणखीनच तीव्र होते.
  • बेडवर असे सेक्स पोजिशन्स ट्राय करा ज्यात एकमेकांस जास्त मिठी मारणे किंवा एकमेकांच्या शरीराचा संपर्क जास्त होईल. ज्यामुळे तुम्हाला थंडीत देखील गरमीचा जबरदस्त अनुभव मिळेल.

याचाच अर्थ थंडीतील सेक्स हे पावसाळ्यातील सेक्स इतकेच रोमांटिक आणि अविस्मरणीय असे असते. यात वातावरणात आलेला गारवा तुमच्या अंगातील उष्णता वाढविण्यास खूप मदत करतो आणि तुमच्या जोडीदाराला तुमच्या आणखीनच जवळ आणतो.

(टीप- या लेखात दिलेली माहिती ही प्राप्त माहितीनुसार आहे. या माहितीची लेटेस्टली मराठी पुष्टी करत नाही.  म्हणून लेखात दिलेल्या कोणत्याही टिप्स किंवा सूचना अवलंबताना डॉक्टरांचा सल्ला घ्या.)