
हस्तमैथुन केल्याने शुक्राणूंची संख्या कमी होते? याचा परिणाम प्रजनन क्षमतेवर होतो का? असे विविध प्रश्न हस्तमैथुन करताना आपल्या मनात उद्भवतात. पुरुषांच्या वीर्यातून जे निघते त्याला स्पर्म, लिक्विड किंवा प्रोस्टाग्लॅंडिन असे म्हटले जाते. अंडकोषात वीर्याचे निरंतर उत्पादन होते. पौगंडावस्थेनंतर पुरुषाचे शरीर वीर्य निर्मिती करत राहते. यापासून सुटका मिळवण्यासाठी पुरुष मंडळी हस्तमैथुन करतात. हस्तमैथुन करणे ही पूर्णपणे मजेशीर बाब असून त्यामुळे कोणत्याही प्रकारे शुक्राणूंची संख्या कमी होत नाही. त्याचसोबत त्यांची पुर्निमिती करण्यासाठी काही परिणाम होत नाही. (Signs of Sexual Tension: सेक्शुअल तणावाची 'ही' आहेत कारणे)
नियमितपणे हस्तमैथुन करणे हे प्रत्येकावर अवलंबून असते. हस्तमैथुनचा तुमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असेल तर समस्या उद्भवू शकते. तसेच तुम्हाला तणावातून बाहेर पडायचे असेल तेव्हा सुद्धा तिच परिस्थिती उद्भवते. स्वत:ला सेक्शुअली आनंद मिळण्याचा एकच मार्ग म्हणजे हस्तमैथुन करणे.
हस्तमैथुन करताना 'या' काही गोष्टी लक्षात ठेवा
-हस्तमैथुन करताना कोणत्याही धारधार वस्तूचा (वाढलेली नखे) यांचा वापर करु नये
-तुम्हाला दुखेल किंवा तुम्हाला त्यामुळे अस्वस्थ वाटेल असेल अशा कोणत्याही पद्धतीचा वापर करण्यापासून दूर रहा
-हस्तमैथून करताना प्रायव्हेट पार्ट मध्ये जळजळ सुद्धा होऊ शकते. त्यामुळे प्रोटेक्शनचा वापर करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकते.
-एखाद्याच्या मर्जी व्यतिरिक्त त्याच्या समोर हस्तमैथुन करणे हा गुन्हा आहे. तसेच 18 वर्षाखालील मुलाच्या समोर जरी हस्तमैथुन केले तर त्याला लैंगिक अत्याचार किंवा गुन्हा मानले जाते.
कधीकधी रात्री झोपल्याने पुरुषांच्या जननेंद्रियात ताण येऊ शकतो आणि त्या नंतर किंवा त्याशिवाय वीर्य बाहेर येऊ शकते. या प्रक्रियेला Nightfall असे संबोधले जाते. हे अत्यंत नैसर्गिक असून सर्वसाधारण प्रक्रिया आहे. त्याचसोबत पुरुषांच्या शरिरातील विकासाचा हा एक भागच समजला जातो.
(टीप- या लेखात दिलेल्या आरोग्याशी संबंधित सर्व माहिती माहितीच्या उद्देशाने लिहिली गेली आहे. लेखात नमूद केलेल्या टिप्स पूर्णपणे प्रभावी होतील असा आमचा दावा नाही, म्हणून लेखात दिलेल्या कोणत्याही टिप्स किंवा सूचना वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या)