कंडोम (Condoms) ही जवळजवळ प्रत्येक अडल्ट व्यक्तीच्या जीवनातील महत्वाची गोष्ट आहे. गर्भधारणा (Birth Control) टाळण्यासाठी गर्भनिरोधकांचा (Contraceptives) वापर केला जातो व यामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणावर वापरली जाणारी गोष्ट म्हणजे कंडोम. गर्भनिरोधक हे कमीतकमी दुष्परिणामांसह 100 टक्के प्रभावी असणे गरजेचे आहे. आपल्या गरजा आणि योग्यतेनुसार गर्भधारणा टाळण्याचे बरेच पर्याय आहेत. असे विविध पर्याय विविध मार्गांनी जन्म नियंत्रण रोखतात. या सर्व पद्धती सुरक्षित आणि व्यावहारिक आहेत, तसेच योग्यरित्या वापरल्यास त्या परिणामकाराकाही ठरतात. मात्र बर्याच वेळा, अशा पर्यायायांचा चुकीच्या पद्धतीने वापर केल्यास ते अकार्यक्षम ठरू शकतात.
कंडोम हा जन्म नियंत्रण पद्धतीचा सर्वात सामान्य प्रकार आहे. मार्केटमध्ये पुरुष व महिला अशा दोघांसाठी वापरण्यायोग्य कंडोम्स उपलब्ध आहेत. कंडोम हे पुरुषाच्या शुक्राणूंना महिलेच्या योनीत जाण्यापासून रोखते. ते व्यापकपणे उपलब्ध आहेत तसेच त्यांना कुठेही घेऊन जाणे सोपे आहे. मात्र कंडोमशिवाय इतरही बर्याच सामान्य जन्म नियंत्रण पद्धती आहेत, आजच्या लेखामध्ये आपण त्यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत.
तोंडावाटे घेण्याजोग्या गर्भनिरोधक गोळ्या (Oral Contraceptive Pills) -
गर्भधारणा रोखण्यासाठी सध्या स्त्रियांना तोंडावाटे घेण्याजोग्या गर्भनिरोधक गोळ्या उपलब्ध आहेत. अशा गोळ्याही जन्म नियंत्रण रोखण्याची एक सामान्य पद्धत आहे. या गर्भनिरोधक गोळ्याचे बरेच फायदे आहेत व त्यांचा योग्यप्रकारे वापर केला तर त्या प्रभावी आहे. या गोळ्या घेण्यापूर्वी महिलांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
नुवा रिंग (Nuva Ring) -
नुवा रिंग ही योनीची अंगठी आहे जी महिला आपल्या योनीमध्ये घालू शकतात. योनीमध्ये ही रिंग 21 दिवसापर्यंत ठेवली जाऊ शकते. 21 दिवसांनंतर ही रिंग काढावी व 7 दिवसांच्या अंतरानंतर नवीन रिंग बदलणे गरजेचे आहे. (हेही वाचा: संभोग न करताही पुरुषांना मिळू शकतो परमोच्च आनंद; Sex शिवाय 'ते' सुख मिळवण्यासाठी जाणून घ्या सोपे मार्ग)
आययूडी (IUD) -
- आययूडी म्हणजे इंट्रायूटरिन डिव्हाइस. हे एक लहान, टी-आकाराचे डिव्हाइस आहे जे महिलेच्या गर्भाशयात घातले जाते. हे तिथे 3-10 वर्षे ठेवता येते. गर्भनिरोधक म्हणून ही एक सुरक्षित पद्धत आहे.
- आययूसीडी (IUCD) - इंट्रायूटरिन कॉपर डिव्हाइस, हे गर्भाशयाच्या आत 5 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी अंतरासाठी ठेवले जाऊ शकते
- मीरेना (Mirena) - इंट्रायूटरिन एलएनजी डिव्हाइस देखील गर्भाशयात 5 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी काळ ठेवता येते
(टीप- या लेखात दिलेल्या सर्व माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने लिहिलेली आहे. कोणत्याही रोगाच्या उपचारांसाठी याकडे वैद्यकीय सल्ला म्हणून पाहू नये. आम्ही याचा दावा करीत नाही की, लेखात दिलेली माहिती तुमच्या सर्व समस्यांवर प्रभावी ठरेल. लेखात दिलेल्या कोणत्याही टिपा किंवा सूचना अंमलात आणण्यापूर्वी कृपया डॉक्टरांशी सल्लामसलत करा.)