राशीभविष्य (फोटो सौजन्य- फाइल इमेज)

27 मे 2020 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? तर जाणून घ्या बुधवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

मेष:  मेष राशीतील व्यक्तींना आज तुमच्या जोडीदाराची एक विस्यमकारक बाजू तुम्हाला  पाहायला मिळेल. जर तुम्ही नवीन व्यावसायिक भागीदारीचा विचार करत असाल, तर कोणताही शब्द देण्यापूर्वी सर्व महत्त्वाच्या घटकांची माहिती जमा करा.

शुभ उपाय- घरातून निघताना साखर खाऊन निघा

शुभ दान- गरजू व्यक्तींना अन्नदान करा

शुभ अंक- 6

शुभ रंग- पिवळा

वृषभ: मित्र आणि जवळचे स्नेही मदतीचा हात पुढे करतील. तुमची स्थिती काय आहे हे तुमच्या प्रिय व्यक्तीला समजावून सांगण्यात तुम्हाला खूप अडचणी येतील.

शुभ उपाय- देवाचे नामस्मरण करा

शुभ दान- लाल वस्र दान करा

शुभ अंक- 8

शुभ रंग- हिरवा

मिथुन: आजच्या दिवशी मिथुन राशीतील व्यक्तींनी आपल्या मुलांची विशेष काळजी घ्या. कारण, जर तुम्ही असे केले नाही तर, त्यांची तब्बेत बिघडू शकते आणि तुम्हाला त्यांच्या स्वास्थ्यावर बराच पैसा खर्च करावा लागू शकतो.

शुभ उपाय- घरात धुपबत्ती करुन पूजा करा.

शुभ दान- रक्तदान करा.

शुभ अंक- 4

शुभ रंग- गुलाबी