व्यक्तीच्या मृत्यूनंतर आत्म्याला सद्गती मिळावी; म्हणून श्राद्ध करणे हे हिंदु (Hindu) धर्माचे एक वैशिष्ट्य आहे. प्रतिवर्षी पितृपक्षातील (Pitru Paksha) कृष्णपक्षात महालय श्राद्ध केले जाते. श्राद्ध करण्याचे महत्त्व, पद्धत, तसेच श्राद्धपक्ष हा शुभकार्यासाठी निषिद्ध का मानला जातो,
व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्यांच्या आत्म्यास शांती मिळावी, मोक्षप्राप्ती व्हावी यासाठी पितरांसाठी पितृपंधरवड्यात श्राद्ध घातले जाते. यंदा 13 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर हा पितृपंधरवड्याचा कालावधी असणार आहे. या दिवसात आपल्या पितरांच्या आत्म्यास शांती मिळावी म्हणून श्राद्ध घातले जाते. शास्त्रात असे म्हटले आहे की, असे केल्यास आपले पितर वर्षभर तृप्त राहतात. तसे न झाल्यास घरातील व्यक्तींना त्रास होतो होतो एसा लोकांमध्ये समज आहे. श्राद्ध करणे हे हे हिंदु धर्माचे एक वैशिष्ट्य आहे. प्रतिवर्षी पितृपक्षातील कृष्णपक्षात महालय श्राद्ध केले जाते. पितृपंधरवड्यात तिर्यक लहरींचे आणि यमलहरींचे आधिक्य असल्याने यात दिवसांत कोणतेही शुभकार्य केले जात नाही किंवा कोणतेही मूल्यवान अशी खरेदी, गुंतवणूक केली जात नाही.
या पितृपंधरवड्याबाबत लोकांच्या मनात अनेक प्रश्न असतात ते कधी करावे, कसे करावे इ. त्याबाबत आम्ही विवेक वैद्य या गुरुजींना याबाबत काही प्रश्न विचारले, जाणून घेऊया त्यांच्याकडूनच सविस्तर
1. चालू वर्षात घरातील एखादी व्यक्ती मृत झाली तर महालय श्राद्ध करता येते का?
- नाही. मृत व्यक्तीस एक वर्ष पूर्ण झाल्याशिवाय महालय श्राद्ध करता येत नाही.
2. घरात कुणी सवाष्ण महिला मृत झाली असल्यास त्यांचे कोणत्या दिवशी श्राद्ध करावे ?
- सवाष्ण महिला मृत होऊन एकवर्ष पूर्ण झाल्यानंतर पितृपक्षात “अविधवा नवमी” (भाद्रपद कृष्ण नवमी) या दिवशी श्राद्ध करता येते.
हेही वाचा- Pitru Paksha 2019 Dates: पितृपंधरवडा 2019 मध्ये पहा कोणत्या तिथीचं श्राद्ध कधी असेल?
3. ज्या पूर्वजांची तिथी पौर्णिमा असेल त्यांचे श्राद्ध कोणत्या दिवशी घालतात?
- पंचमी, अष्टमी, द्वादशी किंवा सर्वपित्री अमावस्येला घालतात.
4. संन्याशी किंवा घर सोडून गेलेल्या व्यक्तींचे श्राद्ध कोणत्या तिथीस घालावे?
- अशा व्यक्तींचे श्राद्ध भाद्रपद कृष्ण द्वादशीला घालतात.
5. ज्यांचा मृत्यू हा घातपाताने झाला असेल किंवा आत्महत्या केली असेल त्यांचे श्राद्ध कोणत्या तिथीस घालावे?
- शस्त्रदहित श्राद्ध म्हणजे भाद्रपद कृष्ण चतुर्दशी या तिथीस घालावे.
6. पितरांची तिथी माहित नसल्यास कोणत्या दिवशी श्राद्ध करावे ?
- भाद्रपद कृष्ण द्वादशी किंवा अमावस्या ( सर्वपित्री अमावस्या ) या दिवशी सर्व पितरांचे (ज्ञात-अज्ञात)श्राद्ध घालता येते. तसेच ब्राम्हणास हिरण्यदान व अमावस्या मागणाऱ्या स्त्रीला शिधा दान द्यावे.
7. पितृपक्षात पारायण करता येते का ?
- हो. पितृपक्षात कोणत्याही ग्रंथाचे पारायण करता येते. ( गुरुचरित्र/नवनाथ/भागवत/
श्रीपाद चरित्र इत्यादी) पितृपक्षात केलेले पारायण हे पितरांना संतोषकारक असते.
पितरांच्या स्मरणासाठी पवित्र्य मानला जाणारा हा पितृपंधरवडा तितक्याच श्रद्धेने केल्यास आपल्या पितरांचा कृपाशिर्वाद कायम आपल्यावर आणि आपल्या घरावर राहतो असेही वैद्य गुरुजी म्हणाले.