Shraddha Dates 2019: हिंदू धर्मीयांमध्ये अश्विन कृष्ण प्रतिपदेपासून सुरू होणार्या पुढील 15 दिवसांमध्ये मृत्यू पावलेल्यांच्या आत्म्याला शांती मिळावी याकरिता श्राद्ध घालण्यासाठी प्रथा आहे. हा 15 दिवसांचा काळ पितृपंधरवडा/ पितृ पक्ष (Pitru Paksha) म्हणून पाळला जातो. या 15 दिवसांच्या काळात शुभ कार्य टाळली जातात आणि पितरांच्या मृतात्म्यांना शांती मिळावी म्हणून प्रार्थना केली जाते. यंदा पितृपंधरवडा हा 14 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर या कालावधीमध्ये पाळला जाणार आहे. त्यामुळे तुमच्या घरात, कुटुंबामध्ये मृत पावलेल्या व्यक्तींचे श्राद्ध तिथीनुसार कोणत्या दिवशी करावे यासाठी हे वेळापत्रक नक्की पहा.
पारंपारिक रिती रिवाजांनुसार पितृपक्षामध्ये श्राद्धाच्या संकल्पनेमागे वडील, आजोबा आणि पणजोबा हे तीन देवतांसमान मानले जातात. त्यानुसार वडीलांना वसू समान, आजोबांना रूद्र देवतांसमान आणि पणजोबांना आदित्य देवता समान मानलं जातं. यमराज दरवर्षी श्राद्धाच्या काळात सार्या जीवांना मुक्त करतो. आणि त्यांना प्रिय व्यक्तीकडे जाऊन तर्पण ग्रहण करण्याची मुभा असते. Pitru Paksh 2019: हिंदू धर्मियांमध्ये पितृ पक्षाला का आहे एवढे महत्व? जाणून घ्या यंदाची तिथी आणि संबंधित इतिहास
श्राद्धाच्या तिथीनुसार यंदा कधी असेल कार्य?
14 सप्टेंबरः प्रतिपदा श्राद्ध
15 सप्टेंबरः द्वितीया श्राद्ध
17 सप्टेंबरः तृतीया श्राद्ध
18 सप्टेंबरः चतुर्थी श्राद्ध
19 सप्टेंबरः पंचमी श्राद्ध
20 सप्टेंबरः षष्ठी श्राद्ध
21 सप्टेंबर : सप्तमी श्राद्ध
22 सप्टेंबर : अष्टमी श्राद्ध
23 सप्टेंबर : नवमी श्राद्ध
24 सप्टेंबर : दशमी श्राद्ध
25 सप्टेंबर : एकादशी श्राद्ध, द्वादशी श्राद्ध
26 सप्टेंबर : त्रयोदशी श्राद्ध
27 सप्टेंबर: चतुर्दशी श्राद्ध
28 सप्टेंबर : सर्वपित्री अमावस्या
यंदा तिथीनुसार श्राद्धामध्ये एकादशी आणि द्वादशीचे श्राद्ध एकाच दिवशी आहे. त्यामुळे दिवसभराच्या दोन टप्प्यांमध्ये यंदा एकादशी आणि द्वादशीचे श्राद्ध केले जाणार आहे. श्राद्धाच्या महिन्यात पिंड दान आणि तर्पण देऊन पितरांच्या शांतीसाठी प्रार्थना केली जाते.