Horoscope Today राशीभविष्य, शनिवार 17 फेब्रुवारी 2024: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
राशी भविष्य- (फोटो सौजन्य- फाइल इमेज)

Horoscope Today 17 February 2024 in Marathi: आजचे राशीभविष्य,  शनिवार 17 फेब्रुवारी 2024 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल, कोणत्या राशींच्या व्यक्तींचे चमकणार नशीब, कोणाला हा दिवस ठरणार शुभ तर कोणाला अशुभ, जाणून घ्या शनिवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

मेष (Aries Horoscope Today): व्यवसायासाठी उत्तम वेळ, तसेच नवीन कामात यश मिळण्याची शक्यता. आज कामानिमित्त केलेला प्रवास फायद्याचा ठरू शकेल. पैसे मिळवण्याच्या आणि व्यापाराच्या नव्या संधी येतील मात्र घाई करू नका. पोटाच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता त्यामुळे बाहेरचे खाणे टाळा.

शुभ उपाय- गायत्री मंत्राचा जप करा.

शुभ दान- इच्छेनुसार पैसे दान करा.

शुभ अंक- 6

शुभ रंग- निळा

वृषभ (Taurus Horoscope Today):  आजचा दिवस फारसा लाभदायक नाही, त्यामुळे पैशांची स्थिती तपासा आणि आपल्या खर्चांवर मर्यादा घाला. जिभेवर ताबा राहू द्या. जुने जोडलेले बंध किंवा नाती आज उपयोगी पडू शकतील. इलेक्ट्रिक गोष्टींपासून शक्यतो दूर रहा. आज कोणालाही कसलीही वचनबद्धता देणे टाळा.

शुभ उपाय- सकाळी उठून पूजा करून गणेशाला दुर्वा वाहा.

शुभ दान- गरजूला धातूचे दान करा.

शुभ अंक- 5

शुभ रंग- पांढरा

मिथुन (Gemini Horoscope Today): मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस उत्तम राहील. आज तुमची आर्थिक स्थिती ठीक-ठाक असेल. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी आजचा दिवस फलदायी नाही. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस नवीन संधी घेऊन येईल. आज कुटुंबाची साथ लाभेल. घरातल्या वडिलधाऱ्या मंडळींच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका.

शुभ उपाय- वाहत्या पाण्यात नारळ सोडा

शुभ दान- कोणत्याही गोड पदार्थाचे दान करा.

शुभ अंक- 1

शुभ रंग- लाल

कर्क (Cancer Horoscope Today): कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस व्यस्त राहील. कामाचा शारीरिक तसेच मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. नोकरी-व्यवसायात बऱ्याच चढ उतारांचा सामना करावा लागेल. आज आरोग्य संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. जवळच्या लोकांपासून सावध रहा. कोणावरही चटकन विश्वास टाकू नका. आर्थिक व्यवहारासंबंधी बाबी कोणासोबत शेअर करू नका.

शुभ उपाय- शंकराच्या पिंडीला बेल-गंध वाहा.

शुभ दान- कोणत्याही काचेच्या वस्तूचे दान करा.

शुभ अंक- 6

शुभ रंग- हिरवा

सिंह (Leo Horoscope Today): सिंह राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस उत्तम आहे. मनासारखी कामे होण्याची शक्यता. कामात यश मिळून तुमचे कौतुक केले जाईल. कोर्ट-कचेऱ्यासंबंधी पश्न निकालात लागण्याची शक्यता. मात्र व्यवसायामध्ये जोडीदारावर पूर्णतः विश्वास टाकू नका. विचारपूर्वक गुंतवणूक केल्यास भविष्यात उत्तम फळ मिळेल.

शुभ उपाय- घरातून बाहेर पडताना थोडे काळे तीळ खिशात बाळगा.

शुभ दान- मंदिरात तेलाचे दान करा.

शुभ अंक- 8

शुभ रंग- केशरी

कन्या (Virgo Horoscope Today): इच्छित कार्यात यश मिळेल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. शेअर्समध्ये गुंतवणूक करू नका. कुटुंबासाठी खर्च होण्याची शक्यता. प्रवास काळजीपूर्वक करा.

शुभ उपाय- सूर्याला जल अर्पण करा.

शुभ दान- अन्नदान करा.

शुभ अंक- 9

शुभ रंग- करडा

तुळ (Libra Horoscope Today): महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी दिवस चांगला नाही. नोकरीमध्ये दिलासादायक गोष्टी घडतील. इच्छित कार्ये पूर्णत्वास जातील. खरेदीसाठी उत्तम दिवस. मुलांशी खटके उडण्याची शक्यता परंतु त्यामुळे भावनिक होऊ नका. जवळचे लोक गैरफायदा घेण्याची शक्यता, सावध रहा.

शुभ उपाय- पिंपळाच्या झाडावर जल चढवावे.

शुभ दान- वस्त्रदान करा

शुभ अंक- 2

शुभ रंग- गुलाबी

वृश्चिक (Scorpio Horoscope Today): आपल्या स्वभावातील नम्रतेमुळे अनेक कार्ये तडीस जातील. कटु शब्दांचा उपयोग आपल्यासाठी अडचणी निर्माण करू शकतात. मानसिक व शारीरिक स्थिती उत्तम राहील. वरिष्ठांसोबतचे संबंध चांगले ठेवा. नवीन संधी मिळतील. कौटुंबिक विषयांमध्ये धनाचा व्यय होईल. व्यापार वर्गासाठी दिवस संमिश्र राहील.

शुभ उपाय- गायत्री मंत्राचा जप करा.

शुभ दान- पक्ष्यांना दाणे द्या

शुभ अंक- 7

शुभ रंग- जांभळा

धनु (Sagittarius Horoscope Today): आज घरात संतुलित वातावरण ठेवणे फायद्याचे ठरेल. वादविवाद, अनावश्यक चर्चा टाळा. व्यावसायिक पातळीवर देखील अडचणींना तोंड द्यावे लागेल, मात्र जिभेवर ताबा ठेवा. स्वास्थ्य विषयक काळज्या मिटण्याची शक्यता. घरातील मोठ्यांचा सल्ला फायद्याचा ठरेल.

शुभ उपाय- मंदिरात तेलाचा दिवा लावा.

शुभ दान- धान्य दान करा.

शुभ अंक- 4

शुभ रंग- लाल

मकर (Capricorn Horoscope Today): आजचा दिवस सकारात्मक राहील. मनातील उर्जा व्यवसायात किंवा नोकरीच्या ठिकाणी फलदायी ठरेल. आध्यात्मिक प्रवास घडण्याची शक्यता. आरोग्य साथ देईल, परंतु पथ्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. नवीन काही सुरु करण्याचे संकेत मिळण्याची शक्यता.

शुभ उपाय- गायीला चारा द्या.

शुभ दान- इच्छेनुसार पैसे दान करा.

शुभ अंक- 3

शुभ रंग- पांढरा

कुंभ (Aquarius Horoscope Today): विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस फलदायी ठरेल. काहीजण कारणाशिवाय तुमच्या विरुद्ध जातील, मात्र त्यावर वेळ आणि उर्जा खर्च करू नका. कर्जांवरून देखील वाद-विवाद होऊ शकतील. मोठी गुंतवणूक टाळलेली बरी. नकारात्मक प्रभाव टाळण्यासाठी संध्याकाळी मंदिरात देवाचे दर्शन घ्या.

शुभ उपाय- पांढरे वस्त्र परिधान करा

शुभ दान- पांढऱ्या रंगाची वस्तू अथवा वस्त्र दान करा.

शुभ अंक- 5

शुभ रंग- हिरवा

मीन (Pisces Horoscope Today): मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ आहे. नोकरी-व्यवसायात पुढे झेप घेण्यासाठी संधी उपलब्ध होतील. आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी जोडीदाराची साथ लाभेल. रखडलेली कामे आज पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वादविवाद-भांडणे टाळा. संध्याकाळी कुटुंबासोबत वेळ व्यतीत कराल.

शुभ उपाय- सूर्याला अर्घ्य द्या.

शुभ दान- पिठाचे दान करा.

शुभ अंक- 1

शुभ रंग- पिवळा