
Horoscope Today 27 March 2023 in Marathi: आजचे राशीभविष्य, सोमवार 27 मार्च 2023 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल, कोणत्या राशींच्या व्यक्तींचे चमकणार नशीब, कोणाला हा दिवस ठरणार शुभ तर कोणाला अशुभ, जाणून घ्या सोमवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.
मेष (Aries Horoscope Today): तुमचा आजचा दिवस आनंदी राहील. मनाला प्रसन्न वाटेल. नोकरी, व्यवसायात यश मिळेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
शुभ उपाय- 'ॐ रां राहवे नम:' चा जप करा.
शुभ दान- दुधाचे दान करा.
शुभ अंक- 9
शुभ रंग- पिवळा
वृषभ (Taurus Horoscope Today): आरोग्याकडे लक्ष द्यावे. अविचाराने केलेले वर्तन अडचणीत आणू शकते. रागावर नियंत्रण ठेवा. स्नेही आणि मित्रांची भेट होईल.
शुभ उपाय- गणेशाला दुर्वा अर्पण करा.
शुभ दान- अन्नदान करा.
शुभ अंक- 1
शुभ रंग- निळा
मिथुन (Gemini Horoscope Today): बेरोजगारांना घरापासून लांब ठिकाणी नोकरीच्या संधी येतील. अधिकारी वर्गास कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल. दुकानदारांनी उधारी उसनवारी टाळावी. व्यावसायिकांनी जपून व्यवहार करावे.
शुभ उपाय- सकाळी उठल्यावर सूर्याला जल अर्पण करा.
शुभ दान- मंदिरात इच्छेनुसार दक्षिणा दान करा.
शुभ अंक- 3
शुभ रंग- करडा
कर्क (Cancer Horoscope Today): आज महत्वाच्या घरगुती प्रश्नांत वडीलधाऱ्यांचे मत अवश्य घ्या. कोणत्याही बाबतीत अतिआक्रमकता नुकसानास कारणीभूत ठरेल. कायद्याची चौकट मोडणे महागात पडू शकते. विश्वासू मित्रांकडून दगा होऊ शकतो.
शुभ उपाय- आज काळे वस्त्र परिधान करणे टाळा.
शुभ दान- आज तांदूळ, साखर किंवा पांढऱ्या वस्त्राचे दान करा.
शुभ अंक- 5
शुभ रंग- पांढरा
सिंह (Leo Horoscope Today): बरेच दिवसापासून रेंगाळलेली कामे आज होण्याची शक्यता आहे. गृहोद्योग करणाऱ्या महीलांची मिळकत चांगली राहील. अपत्याकडून शुभवार्ता प्राप्त होऊ शकते. घरगुती वातावरण प्रसन्न ठेवण्यासाठी प्रयत्न केल्यास फायदेशीर ठरेल.
शुभ उपाय- मंदिरात तेलाचा दिवा लावा.
शुभ दान- लोकरीचे कपडे दान करा
शुभ अंक- 6
शुभ रंग- लाल
कन्या (Virgo Horoscope Today): गणेशाच्या कृपेने आज जवळजवळ प्रत्येक काम पूर्ण होईल. व्यापाऱ्यांकडे थकलेले पैसे मिळतील. आर्थिक लाभ होईल. कौटुंबिक सुख-शांती लाभेल. सार्वजनिक आयुष्यातही मान-सन्मान मिळेल. एकंदरीत आजचा दिवस उत्तम राहील.
शुभ उपाय- सकाळी उठल्या उठल्या लगेच आरसा किंवा घड्याळ पाहणे टाळा.
शुभ दान- पिठात थोडी साखर मिसळून ते पीठ मुंग्यांना खाऊ घालावे.
शुभ अंक- 9
शुभ रंग- हिरवा
तुळ (Libra Horoscope Today): आरोग्याची समस्या जाणवेल. दुर्घटनांपासून सावध राहा. नोकरीच्या ठीकाणी आज कामाचा ताण राहील.
शुभ उपाय- पिंपळाच्या झाडावर जल चढवावे
शुभ दान- गरिबाला अन्नदान करा.
शुभ अंक- 2
शुभ रंग- केशरी
वृश्चिक (Scorpio Horoscope Today): आज कोणत्याही वादात पडू नये. प्रवासाचा योग असला तरी कृपया तो टाळावा. अविचाराने केलेले वर्तन अडचणीत आणू शकते. उत्पन्नाच्या साधनांमध्ये वृद्धी होईल.
शुभ उपाय- कामानिमित्त बाहेर पडताना शर्टच्या वरच्या खिशात थोडेतरी पैसे ठेवावे.
शुभ दान- पिवळी कपडे, पिवळे फळ किंवा पिवळ्या वस्तू दान कराव्या.
शुभ अंक- 4
शुभ रंग- लाल
धनु (Sagittarius Horoscope Today): आज आपल्या कुवती बाहेर कोणतीच रिस्क घेऊ नका. हातचे सोडून पळत्यामागे धावायचा मोह टाळा. नवीन कार्य अथवा प्रकल्पाची सुरुवात करणे टाळा. जवळच्या व्यक्तीचा सल्ला माना.
शुभ उपाय- तुळस किंवा केळीच्या झाडाला जल अर्पण करा.
शुभ दान- मुंग्यांना व पक्ष्यांना अन्न दान करा.
शुभ अंक- 7
शुभ रंग- जांभळा
मकर (Capricorn Horoscope Today): आज घराबाहेर वावरताना डोके थंड व वाणीत गोडवा असुद्या. कार्यक्षेत्रात नवीन आव्हाने आत्मविश्वासाने स्विकाराल व त्याने भविष्यात फायदा होईल. नवीन कार्याची सुरुवात करण्यास उत्तम दिवस. व्यापार उद्योगात मिळकत मनाजोगती असेल.
शुभ उपाय- गणेशाची पूजा करून, नैवेद्य दाखवा.
शुभ दान- गरजूला धन्य दान करा.
शुभ अंक- 3
शुभ रंग- गुलाबी
कुंभ (Aquarius Horoscope Today): भविष्यासाठी नियोजन करण्यास अनुकूल दिवस आहे. आज तुमच्यासाठी ईच्छापूर्तीचा दिवस असून, तुमच्या काही अपुऱ्या स्वप्नांची पूर्तता होण्याची शक्यता आहे. मनामध्ये फक्त सकारात्मक विचारांना थारा द्या, ज्यामुळे मनस्थिती उत्तम राहील.
शुभ उपाय- शिवलिंगावर जल किंवा दुधाने अभिषेक करा.
शुभ दान- महिलेस सौभाग्यलंकाराचे दान करा.
शुभ अंक- 1
शुभ रंग- आकाशी
मीन (Pisces Horoscope Today): कार्यक्षेत्रात काही मनाविरूध्द घटना घडण्याची शक्यता आहे. मात्र त्यावर त्वरित प्रतिक्रिया देणे टाळा. गोष्टी समोरच्याच्या कलाने घ्या. नातेसंबंधांमध्ये गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. जोडीदाराचे मन सांभाळा.
शुभ उपाय- पिंपळाच्या झाडाच्या मुळाला पाणी अर्पण करावे.
शुभ दान- गरजूला उडीद, मूग आणि तूर डाळ दान करा.
शुभ अंक- 6
शुभ रंग- पोपटी