Horoscope Today 29 February 2024 in Marathi: आजचे राशीभविष्य, गुरुवार, 29 फेब्रुवारी 2024 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल, कोणत्या राशींच्या व्यक्तींचे चमकणार नशीब, कोणाला हा दिवस ठरणार शुभ तर कोणाला अशुभ, जाणून घ्या गुरुवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.
मेष: मेष राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात कोणतातरी मोठा बदल होण्याची शक्यता. अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तुमच्या मनात जे काही चालले आहे, ते जवळच्या व्यक्तीसोबत शेअर करा. नक्कीच फायदेशीर सल्ला प्राप्त होईल.
शुभ उपाय- सकाळी उठल्यावर कुलदेवतेचे नामस्मरण करा.
शुभ दान- गाईंना चारा द्या.
शुभ अंक- 6
शुभ रंग- जांभळा
वृषभ: आज जुने संबंध मजबूत करण्यात यश मिळेल. कोणतेही महत्वाचे काम हातात घेण्याआधी जुन्या जबाबदाऱ्यांचा विशार करा. आज मानसिक आणि आर्थिक तणाव वाढू शकतो. गुंतवणूक टाळा.
शुभ उपाय- घरात लक्ष्मीच्या पावलांची पूजा करा.
शुभ दान- कुत्र्याला जेवण द्या.
शुभ अंक- 1
शुभ रंग- पिवळा
मिथुन: महत्त्वपूर्ण लोकांसोबत चांगला ताळमेळ राहील. भविष्यातील आर्थिक स्थितीबद्दल विचार कराल. नोकरीत नव्या जबाबदाऱ्या मिळतील. नवीन संधी चालून येण्याची शक्यता. जोडीदाराचा सल्ला टाळू नका.
शुभ उपाय- एखादी चांदीची वस्तू स्वतःजवळ ठेवा
शुभ दान- नारळ दान करा.
शुभ अंक- 8
शुभ रंग- निळा
कर्क: नव्या गोष्टी शिकाल. एखाद्या नवीन योजनेसह नवे काम सुरू कराल. जोडीदाराशी संबध अधिक मधूर होतील. आज डोके आणि जीभ शांत ठेऊन काम करायचे आहे. आपल्या वागण्याने कुणाला दुखवू नका, नाहीतर भविष्यात त्रास उद्भवेल.
शुभ उपाय- दही खाऊन घराबाहेर पडा.
शुभ दान- गरीबांना अंथरुण दान करा.
शुभ अंक- 6
शुभ रंग- करडा
सिंह: जुनी अडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता, मात्र मदत मागताना संकोच बाळगू नका. आज स्वतःचा फायदा कसा होईल याचा विचार करा. भविष्यातील योजनांवर काम सुरु कराल.
शुभ उपाय- सकाळी उठून पूजा करून गणेशाला दुर्वा वाहा.
शुभ दान- तांदूळ दान करा.
शुभ अंक- 8
शुभ रंग- पांढरा
कन्या: स्वतःवर असलेले नियंत्रण आज अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. आज तुम्ही दुसऱ्यांच्या भावना सहज समजू शकाल, मात्र स्वतःच्या भावना शेअर करू नका. समोरच्या व्यक्तीवर त्वरित विश्वास ठेऊ नका. व्यवसायात यश आणण्यासाठी तुम्हाला जोर देऊन काम करण्याची गरज आहे.
शुभ उपाय- घराबाहेर पडताना काहीतरी गोड खा.
शुभ दान- गरजूंना पांढऱ्या रंगाचे वस्त्र दान करा.
शुभ अंक- 9
शुभ रंग- पोपटी
तुळ: आज आर्थिक स्थितीत मोठे बदल होतील, ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल. महत्वाकांक्षेत वाढ होईल. आज योग्य दिशेने प्रवास घडेल आणि कामात यशही मिळण्याची शक्यता.
शुभ उपाय- सरस्वतीचे पूजन करा.
शुभ दान- अन्न दान करा.
शुभ अंक- 4
शुभ रंग- केसरी
वृश्चिक: दिवसभर व्यस्त राहाल. कामकाजासोबत जबाबदाऱ्या वाढतील. व्यापारात समजदारीने निर्णय घ्या. आजचा दिवस कष्टाचा असेल. मात्र त्याचे फळही नक्कीच मिळेल. नवीन कामात यश मिळण्याची शक्यता. आज दूरचा प्रवास टाळा.
शुभ उपाय- शंकराची पूजा करा.
शुभ दान- अन्नदान करा.
शुभ अंक- 9
शुभ रंग- पिवळा
धनु: आजचा दिवस आनंदात व्यतीत कराल. मित्रपरिवारासह वाद घालणे टाळा. प्रिय व्यक्तीकडून आनंदाची बातमी मिळेल. आई-वडिलांची साथ लाभेल. शक्यतो प्रवास आणि बाहेरचे खाणे टाळा. आज जवळच्या व्यक्तींना वेळ देण्याचा दिवस आहे.
शुभ उपाय- खडीसाखर खाऊन बाहेर पडा.
शुभ दान- ब्राम्हणाला दक्षिणा द्या.
शुभ अंक- 3
शुभ रंग- लाल
मकर: अचानक धनलाभ होवू शकतो. अडकलेले पैसे पुन्हा मिळतील. मित्रांची मदत लाभेल. एखादा जुना आजार डोके वर काढण्याची शक्यता, त्याकडे दुर्लक्ष करू नका. प्रेमप्राप्तीसाठी अनुकूल दिवस.
शुभ उपाय- केशर दुधाचा नैवेद्य दाखवा.
शुभ दान- गरजूंना आर्थिक मदत करा.
शुभ अंक- 7
शुभ रंग- गुलाबी
कुंभ: नेहमीच्या कामापेक्षा काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करावा लागेल, ज्यामुळे येणाऱ्या दिवसांत तुम्हाला फायदा होऊ शकतो. आजचा दिवस चांगला आहे. जुन्या अडचणी मार्गी लागतील. कोर्ट-कचेरीच्या प्रकरणांपासून दूर रहा. गुंतवणूक करण्याआधी जोडीदाराचा सल्ला घ्या.
शुभ उपाय- देवाला चाफ्याच्या फुलांचा हार घाला.
शुभ दान- लाल रंगाचे वस्रदान करा.
शुभ अंक- 2
शुभ रंग- लाल
मीन: नोकरी व धंद्यासाठी आजचा दिवस अनुकूल असेल. व्यवसायात तेजी अथवा नोकरीत वृद्धी दिसून येईल. आर्थिक दृष्ट्या आजचा काळ चांगला आहे. उत्पन्नाची साधने वाढवण्याच्या संधी चालून येतील, मात्र धोकादायक गुंतवणुकीपासून सावधान असावे.
शुभ उपाय- घरात धुपबत्ती करुन पूजा करा.
शुभ दान- शक्य असल्यास रक्तदान करा.
शुभ अंक- 4
शुभ रंग- आकाशी