Horoscope Today राशीभविष्य, सोमवार 26 फेब्रुवारी 2024: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
Horoscope

Horoscope Today 26 February 2024 in Marathi: आजचे राशीभविष्य, सोमवार, 26 फेब्रुवारी 2024 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल, कोणत्या राशींच्या व्यक्तींचे चमकणार नशीब, कोणाला हा दिवस ठरणार शुभ तर कोणाला अशुभ, जाणून घ्या सोमवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.

मेष: नोकरीच्या ठिकाणी उत्तम दिवस असेल.  घरगुती कामात अधिक वेळ जाईल. मित्रांची साथ लाभेल. दिवस मजेत घालवाल. हातातील अधिकाराचा वापर कराल. नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा.

शुभ उपाय- सकाळी तुळशीला नमस्कार करा

शुभ दान- गरजूंना मदत करा

शुभ अंक- 6

शुभ रंग- लाल

वृषभ: तुमच्यातील धैर्य वाढीस लागेल. सारासार विचार करूनच मग कृती करावी. हातापायांच्या किरकोळ इजांकडे दुर्लक्ष करू नका. कोणतेही साहस करताना घाई करू नका. प्रवासात खबरदारी घ्यावी.

शुभ उपाय- देवाला गोडाचा पदार्थाचा नैवेद्य दाखवा

शुभ दान- अंथरुण दान करा

शुभ अंक- 3

शुभ रंग- पिवळा

मिथुन: प्रेमातील जवळीक जोपासावी. मुलांशी किरकोळ कारणावरून वाद संभवतात. जुन्या गोष्टींमध्ये फार काळ रेंगाळू नका. अनावश्यक गोष्टींवरील खर्च टाळावा. नवीन गोष्टींमध्ये गुंतवणूक करताना काळजी घ्या.

शुभ उपाय- शंकराची पूजा करा

शुभ दान- भिक्षुकाला पैसे दान करा

शुभ अंक- 2

शुभ रंग- पांढरा

कर्क: कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस संमिश्र आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत घनिष्टता चांगली राहणार नाही. तब्येतीबद्दल काळजी घेणे आवश्यक. आर्थिक व्यवहारांमध्ये त्वरित समोरच्यावर विश्वास ठेऊ नका. आज डोळे आणि कान उघडे ठेवून चालण्याची गरज आहे. कामाचा भार वाढेल.

शुभ उपाय- सकाळी हनुमान चालीसा वाचा.

शुभ दान- पिवळ्या रंगाचे वस्र दान करा

शुभ अंक- 7

शुभ रंग- पिवळा.

सिंह: दिवसभर कामाची गडबड राहील. आपली मनस्थिती गोंधळलेली राहू शकते. कामाचे व्यवस्थित मूल्यमापन करावे. एकाच वेळी अनेक कामात हात घालू नये. इतरांना स्वखुशीने मदत कराल.

शुभ उपाय- सकाळी महादेवाच्या पिंडीला बेलपत्र वाहा.

शुभ दान- कुत्र्याला जेवण द्या

शुभ अंक- 5

शुभ रंग- पोपटी

कन्या: मागील गोष्टींची पुनरावृत्ती टाळावी. मानसिक अस्थिरता जाणवेल. भावनेच्या अति आहारी जाऊ नका. वैचारिक गोंधळ उडू शकतो. आर्थिक बाबतीत हात आखडता घ्या. नोकरीत मोठ्या समस्या भेडसावणार नाहीत, मात्र व्यवसायात तेजी दिसून येणार नाही.

शुभ उपाय- अपशब्द तोंडातून निघणार नाही याची काळजी घ्या

शुभ दान- अन्नदान करा

शुभ अंक- 4

शुभ रंग- केशरी

तुळ: आज कुटुंबात एकोपा राहील त्यामुळे महत्वाचे कौटुंबिक निर्णय घेऊ शकाल. नोकरीतील लोकांचे आयुष्य उत्तम असेल. अनपेक्षित खर्च होऊ शकतात. पैसे उसने देताना किंवा घेताना दक्ष राहा. जोडीदारासोबत समजूतदारपणा दाखवा.

शुभ उपाय- देवाला चाफ्याच्या फुलांचा हार घाला.

शुभ दान- लाल रंगाचे वस्रदान करा.

शुभ अंक- 2

शुभ रंग- आकाशी

वृश्चिक: चांगला व्यावसायिक लाभ संभवतो. कामाच्या ठिकाणी समाधान लाभेल. नसत्या गोष्टींमध्ये लक्ष घालू नका. फक्त आपल्याच कामाशी मतलब ठेवून वागावे. कामे वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा.

शुभ उपाय- सकाळी कुलदैवतेच्या नावाचा जप करा.

शुभ दान- गरजू व्यक्तीला आर्थिक मदत करा.

शुभ अंक- 1

शुभ रंग- निळा

धनु: नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस सकारात्मक असेल. आर्थिक बाबी मार्गी लागतील. परंतु घोटाळे आणि फसवणूक यांच्यापासून स्वतःचे रक्षण करा. व्यवसायिकांनी आजच्या निर्णयांबद्दल खबरदारी घ्या. बेकायदेशीर गोष्टी आणि प्रकरणांपासून दूर राहा.

शुभ उपाय- स्नान झाल्यावर देवाची पूजा करा

शुभ दान- शक्य असल्यास रक्तदान करा

शुभ अंक- 9

शुभ रंग-करडा

मकर: आपल्याचा शब्दावर ठाम राहाल. दिवस मर्जीप्रमाणे व्यतीत कराल. क्षणिक गोष्टींनी खुश व्हाल. वरिष्ठांच्या मर्जीनुसार वागावे. थोडा स्वत:साठी वेळ काढावा.

शुभ उपाय- खाल्ल्यानंतर गुळ खा.

शुभ दान- गरजूंना पांढऱ्या रंगाचे वस्रदान करा.

शुभ अंक- 9

शुभ रंग- पोपटी

कुंभ: आज किरकोळ समस्या उद्भवतील मात्र परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही. आर्थिक जीवन सौख्याचे राहील. जवळच्या मित्रांचा सल्ला फायद्याचा ठरेल. नोकरीत नाव, प्रतिष्ठा आणि प्रगती दिसून येईल. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. जोडीदार किंवा आई-वडिलांसोबत बोलताना काळजी घ्या. कोणाचे मन दुखवू नका.

शुभ उपाय- घरात लक्ष्मीच्या पावलांची पूजा करा.

शुभ दान- मंदिरात तेलाचे दान करा.

शुभ अंक- 1

शुभ रंग- जांभळा

मीन: आपण स्वत:च आपल्या त्रासाला कारणीभूत ठरू शकाल. फार विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. भावंडांना मदत करता येईल. अचानक धनलाभ संभवतो. गुंतवणूक करतांना संपूर्ण विचार करावा.

शुभ उपाय- घरात धुपबत्ती करुन पूजा करा.

शुभ दान- भात, गुळ व चणे यांचे देवळात दान द्या.

शुभ अंक- 3

शुभ रंग- गुलाबी