World AIDS Day: आज 1 डिसेंबर,2018 हा जागतिक एड्स दिवस (World AIDS Day) म्हणून साजरा केला जातो. तसेच यंदाच्या वर्षी जागतिक एड्स दिनाला 30 वर्षे पूर्ण झाली आहेत. तर 'Know Your Status' Theme च्या माध्यमातून एड्स AIDS बद्दल आजच्या दिवशी जनजागृतीचा संदेश समाजामध्ये देण्यात येणार आहे.
1981 रोजी एड्सच्या पहिल्या रुग्णाचे निदान करण्यात आले होते. तसेच एड्स(AIDS) हा आजार समाजाच्या दृष्टीनेअतिशय भयंकर पद्धतीचा आजार असल्याचे मानले जात होते. त्यामुळे समाजात कोणाला एड्स झाला आहे हे जरी कळले तरी समाजातील इतर व्यक्ती या आजाराने त्रस्त झालेल्या व्यक्तिला वाळीत टाकल्यासाखी वागणूक देत होते. मात्र एड्स हा संसर्गजन्य आजार नसल्याचे संशोधनाद्वारे सिद्ध झाले आहे. या आजारावर Antiretroviral Drugs च्या माध्यमातून तो कमी करण्याचे प्रयत्न केले जातात. एड्स हा आजार मुख्यत: HIV बाधित रुग्णाच्या इंजेक्शनची सुई, HIV बाधित व्यक्तीचे रक्त,असुरक्षित लैंगिक संबंध आणि HIV बाधित गरोदर महिलेच्या बाळाला होण्याची शक्यता असते. तर सध्याच्या काळात या आजारापासून दूर राहण्यासाठी दवाखाने आणि रक्त पुरविणारी केंद्रे यांच्याकडून चोख काळजी घेतली जाते. तसेच रुग्णाला इंजेक्शन देण्यात येणारी सुई वापरुन झाल्यावर पुन्हा उपयोगात आणली जात नाही किंवा गरम पाण्यात उकळवून ती निर्जंतुक केली जाते.(हेही वाचा- हुंड्यासाठी अघोरी प्रकार; पत्नीच्या शरीरात HIV Virus सोडले)
काही व्यक्तींमध्ये ठराविक कालांतराने लैंगिक भावना निर्माण होण्यास सुरुवात होणे काही गैर नाही. मात्र लैंगिक संबंध ठेवताना योग्य ती सुरक्षितता बाळगणे ही आवश्यक बाब असल्याचे सांगितले जाते. तर एड्स झालेल्या व्यक्तींनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असा सल्ला दिला जातो. अशा परिस्थितीत एड्स बाधित व्यक्तीला आधार देत त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या काही दिवसात त्याच्या सभोवती आनंदी वातावरण ठेवावे. तर सध्याच्या आत्याधुनिक जगात एड्स विषयी समाजात जनजागृतीचा संदेश वारंवार दिला जातो. तसेच जागतिक एड्स दिनानिमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामुळे यंदाच्या Know Your Status च्या माध्यमातून एड्स बाधित रुग्णांनी या आजारामुळे निराशा न बाळगता जगात आपली स्वत:ची ओळख निर्माण होईल असा संकल्प करुया.