Winter Skin Care Tips: थंडीत अंगाला सुटणारी खाज कमी करण्यासाठी काय कराल?, जाणून घ्या काही सोप्प्या घरगुती टिप्स
Skin Itching (Photo Credits: Wikimedia Commons)

थंडीत (Winter) हवेतील आर्द्रता कमी होत असल्याने आपली त्वचा रुक्ष (Dry Skin) होते. कोरडी पडते. परिणामी त्वचेतील मॉयश्चर कमी झाल्याने आपल्या अंगाला वारंवार खाज सुटत राहते. त्यामुळे खाज (Skin Itching) आल्यावर सतत त्याच त्याच जागेवार बोटांनी खाजवत राहिल्यास आपल्याला त्या जागेवर पुरळ येण्याची शक्यता असते. तो खाजवलेला भाग लालसर होतो आणि परिणामी नखाने सतत खाजवत राहिल्याने त्या भागात जखमा होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत तुमच्या शरीरावर आणि त्वचेवर सततच्या खाजविण्याचा दुष्परिणाम होऊ शकतो.

आपली त्वचा थंडीची दिवसात खूपच नाजूक असते. त्यामुळे त्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. नखाने सतत खाजविल्याने तेथे जखम होऊन ती जडू शकते. यामुळे असे काही घरगुती उपाय (Home Remedies) आहेत ज्यामुळे थंडीत त्वचेवर येणा-या खाजेचा त्रास कमी करता येईल.हेदेखील वाचा- Amazing Benefits of Giloy: गुळवेलाचे सेवन केल्याने होतात 'हे' आरोग्यदायी फायदे; जाणून घ्या

1. कडुलिंबाची पाने उकळून गाळून त्याने स्नान केल्यास खाज कमी होते.

2. तुळशीची पाने खात येत असलेल्या भागावर चोळा वा तुळशीची पाने आणि पाण्यात मिक्स करुन त्याचा लेप बनवून तो खाज येत असलेल्या भागावर चोळा. आराम मिळेल.

3. कोरफडीतील हर त्वचेवर चोळल्यासही खाज कमी होण्यास मदत होते.

4. फळे आणि भाज्यांचे सेवन अधिक प्रमाणात करावे.

5. तुम्हाला त्वचेच्या ज्या भागावर खाज येत आहे तिथे लिंबाच्या रसाचे 2-3 थेंब टाका आणि तो जागा वा-याखाली सुकवा. त्यानंतर काही वेळाने तो भाग स्वच्छ पाण्याने धुवा. खाज कमी येईल.

हे झटपट घरगुती उपाय अंगावर येणारी खाज कमी करण्यास मदत होईल. जर तुमच्याकडे हे सर्व करण्यासाठी वेळ नसेल तर तुम्ही दुकानातून मॉयश्चरायजर आणून देखील खाज कमी करु शकता. हे उपाय एकदा नक्की ट्राय करुन पाहायला हरकत नाही.

(टीप- या लेखात दिलेली माहिती ही केवळ आरोग्याशी संबंधित माहितीच्या उद्देशाने लिहिलेली आहे. कोणत्याही रोगाच्या उपचारांसाठी किंवा वैद्यकीय सल्ल्यासाठी याचा आधार घेऊ नये. आम्ही असा दावा करू शकत नाही की, लेखात नमूद केलेल्या टिप्स उत्तम प्रकारे कार्य करतील, म्हणून लेखात दिलेल्या कोणत्याही टिप्स किंवा सूचना अवलंबात आणण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.)