Winter Health Tips: हिवाळ्यात आजरांपासून दूर राहण्यासाठी करा 'या' औषधी वनस्पतींचा वापर  
Photo Credit: pixabay and Wikimedia Commons

हिवाळा (Winter) म्हटले की आपल्या समोर आधी गरमा गरम चहा, उबदार स्वेटर या गोष्टी येतात.पण या ऋतूमध्ये फक्त बाहेरून नाही तर आपल्या शरीराची आतूनही तेवढीच काळजी घेणे गरजेचे आहे.हिवाळ्यात सर्दी, पडसे, नकल इन्फेक्शन असे बरेच आजार उद्भवतात अशा वेळी सर्वात जास्त उपयोग होतो ते औषधी वनस्पतींचा. वैदिक काळापासून आपल्याकडे वनौषधींचा वापर होत आलेला आहे. तसेच, भारतातील ऋषिमुनींनी आयुर्वेद ही जगाला दिलेली देणगी आहे. अपचन, हातपाय लचकणे, सूज, खरचटणे इत्यादी छोट्या-मोठ्या तक्रारींपासून ते बाळबाळंतिणीची काळजी संगोपन व उपचारसुद्धा अजूनही आयुर्वेदाचे महत्व कमी झालेले नाही. हिवाळ्यात ही अशा काही औषधी वनस्पती आहेत ज्याचा वापर केल्याने आपण आजारांपासून दूर राहु शकू. पाहूयात कोणकोणत्या वस्पतींचा यात समावेश आहे. (Benefits Of Makhana: वजन घटवण्यापासून ते मानसिक ताण कमी करण्यापर्यंत सगळ्यांवर उपयुक्त आहे मखाना; जाणून घ्या फायदे)

हळद (Turmeric)

हिवाळ्यातील प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आणि सर्दी, खोकला आणि छातीत रक्तसंचय दूर करण्यासाठी हे हळद खुप उपयुक्त आहे.

आले (Ginger) 

आले स्वयंपाकघरात सहज सापडते. हिवाळ्यात अनेकांच्या चहा मध्ये आले असते. यामुळे तुमच्या शरीरात उष्णता कायम राहते, घशाची खवखव कमी होते आणि यामुळे सांधेदुखी मध्ये पण अराम मिळतो. आल्याचा वापर भारतीय जेवणात पण केला जातो.

अश्वगंधा (Ashwagandha)

ही औषधी वनस्पती लिम्फोसाइटला किंवा पांढऱ्या रक्त पेशींना संक्रमण आणि विषाणूंविरूद्ध लढण्यास उत्तेजित करण्यास मदत करते. अश्वगंधेचे नियमित सेवन केल्यास रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते.

दालचीनी (Cinnamon) 

दालचीनी हिवाळ्यातील सर्दीपासून बचाव करण्यासाठी आणि रोगप्रतिकारक प्रेरक म्हणून कार्य करण्यासाठी प्रतिजैविक आणि दाहक गुणधर्मांनी हे भरलेले आहे. हे रक्तातील साखर नियंत्रित करते. यात असंख्य पोषक घटक आहेत जे आपल्या आरोग्यासाठी जसे की आर्जिनिन, ऑलिगोसाकेराइड्स, फ्लेव्होनॉइड्स आणि सेलेनियम फायद्यासाठी सिद्ध आहेत. हे सर्दी आणि फ्लूच्या लक्षणांची तीव्रता कमी करण्यात प्रभावीपणे कार्य करतात.

तुळस (Tulasi)

अनेक वर्षांपासून भारतात तुळशीच्या पानांचे सेवन केले जाते. आयुर्वेदानुसार तुळस, अँटीबॅक्टेरियल, अँटीवायरल, अँटीफंगल आणि दाहरोधी आहे. 2-3 काळ्यामिऱ्या आणि अर्धा चमचा मधासोबत काही तुळिशीची पाने खाल्यास वायरल इंफेक्शन पासून नैसर्गिक सुरक्षा मिळेल.

लसूण (Garlic)

रोगप्रतीकर शक्ती वाढवणारी आणि पचनक्रिया सुधारणारी लसूण सहज सापडते. भारतीय जेवणात लसूण असतेच कारण लसूण मध्ये अँटीसेप्टिक आणि अँटीफंगल गुणधर्म आहेत. लसूण शरीरातील उष्णता कायम राखण्यास आणि थंडी, ताप अश्या आजारांपासून संरक्षण करण्यास मदत करते.

टीप- या लेखात दिलेल्या सर्व माहिती केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहिलेली आहे. कोणत्याही रोगाच्या उपचारांसाठी याकडे वैद्यकीय सल्ला म्हणून पाहू नये. आम्ही याचा दावा करीत नाही की, लेखात दिलेली माहिती तुमच्या सर्व समस्यांवर प्रभावी ठरेल. लेखात दिलेल्या कोणत्याही टिपा किंवा सूचना अंमलात आणण्यापूर्वी कृपया डॉक्टरांशी सल्लामसलत करा)