संत्र्याचा वापर किंवा संत्र्याच्या सालीचा वापर नितळ चेह-यासाठी केला जातो हे आपल्यापैकी अनेकांना माहित असेल. त्वचेसाठी संत्री जितकी चांगली आहेत तितकीच ती शरीरासाठीही गुणकारी आहे. संत्र (Orange) हे फळ खूपच गोड असते. हिवाळ्यात संत्री खाल्ल्याने सर्दी होते असे अनेकांचे म्हणणे असते. मात्र ती संत्री प्रमाणापेक्षा जास्त आंबट असली तरच हा त्रास उद्भवतो. अन्यथा हिवाळा हा संत्र्यांचा हंगाम असल्याने फळांच्या हंगामाप्रमाणे ते ते फळं खाल्ल्यास तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. संत्रे ही तितकेच गुणकारी आहेत. मग तुम्ही ज्यूस करुन प्या किंवा ते अख्खं खा. त्याचा तुमच्या शरीराला नक्कीच फायदा होईल.
संत्र्यामुळे शरीराला सी जीवनसत्व मिळते. जाणून घ्या त्याचे 5 महत्त्वाचे फायदे
1. थंडीत नियमितपणे संत्र खाणं तुम्हाला निरोगी ठेवतं.त्यामुळे त्वचेवर आर्द्रता आणि ओलावा राहतो.
2. संत्र्यातील गुणधर्मामुळे किडनी स्टोन होण्याचं प्रमाण कमी होतं,असंही एक निरीक्षण आहे.
हेदेखील वाचा- Winter Health Tips: थंडीत नाक चोंदण्यावर करा हे '5' घरगुती उपाय
3. आपले दात आणि शरीरातली हाडं बळकट ठेवण्यासाठी त्यातलं कॅल्शियम मदत करते.त्यामुळे त्याचा वापर च्युईंगममध्ये केला जातो.
4. संत्र्यात मोठ्या प्रमाणावर फायबर असतं,त्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते.वजन आणि रक्तातल्या साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठीसुध्दा या तंतूंचा (फायबरचा)चांगला उपयोग होतो.
Winter Health Tips: थंडीत संत्री खाण्याचे '5' गुणकारी फायदे - Watch Video
5. त्यातल्या व्हिटॅमिन सीमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.त्यामुळे व्हायरल इन्फेक्शनची शक्यता कमी होते.तसेच कॅन्सर आणि ह्रदयरोगाला लांब ठेवते.
संत्र्यांचा सुवास हा खूप चांगला असल्याने त्याचा वापर अत्तरांमध्येही केला जातो. त्यामुळे थोडक्यात आंबट म्हणून संत्र्याकडे पाठ फिरवणा-यांनी संत्रे खाणे सुरु केले पाहिजे ज्याचा शरीराला नक्की फायदा होईल.