Corona Infection: कोरोना लस घेतल्यानंतरही लोकांना कोरोना संसर्ग का होत आहे? तज्ञांनी सांगितले कारणं आणि बचावाची पद्धती
Coronavirus Vaccine | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Corona Infection: कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव सध्या भारतावर कायम आहे. सध्या लस हा कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी उत्तम उपाय नोंदविला जात आहे. परंतु, देशात आणि परदेशात अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, जिथे लोक लस घेतल्यानंतरही कोरोना संक्रमित होत आहेत. अशा प्रकारच्या घटनांची संख्या कमी असली तरीही धोका कायम आहे. कोरोना लस घेतल्यानंतरही लोकांना कोरोना संसर्ग का होत आहे? यासंदर्भात तज्ञांनी कारणं आणि संसर्ग टाळण्यासाठी उपाय सांगितले आहेत.

लस घेतल्यानंतर कोरोना का होतो?

एखाद्या व्यक्तीने कोरोना लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर त्याला कोरोना संसर्ग झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. या विषयावर, सीके बिर्ला हॉस्पिटलचे डॉ. राजा धर यांनी सांगितलं की, ही लस बूस्टर म्हणून काम करते, जी आपल्याला ताप आणि इतर लक्षणांपासून संरक्षण करण्यात मदत करते. हे आपल्याला मदत करू शकते, परंतु लस घेतल्यानंतरही आपण आपल्या सुरक्षिततेत दुर्लक्ष करू नये. (वाचा - Covid-19 Vaccine Update: भारत बायोटेकची Covaxin लस 18 वर्षाखालील मुलांना मिळणार? Clinical Trials साठी तज्ञांची शिफारस)

याशिवाय मेडिका सुपरस्पेशलिटी हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉ. अविरल रॉय यांच्या म्हणण्यानुसार, लस तुमच्या शरीरात थोडी शक्ती देते. आपल्या नाकातून व्हायरस शरीरात प्रवेश करतो. परंतु आत्ता प्राप्त होत असलेली लस नाकात नव्हे तर रक्तामध्ये अँटिबॉडी तयार करत आहे. त्यामुळे व्हायरस येण्याचा मार्ग खुला आहे. परंतु ही लस घेतल्यास संसर्ग होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी होते.

लसचा एका डोसाने कोणत्याही व्यक्तीला 50-60 टक्के संरक्षण प्रदान होते. तर काही तज्ञांनी 85 टक्के पर्यंत संरक्षण प्रदान होत असल्याचं म्हटलं आहे. त्याच वेळी, दुसरा डोस घेतल्यानंतर संरक्षणाची टक्केवारी 95 टक्क्यांपर्यंत पोहोचते.

मेडिका सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ. अविरल रॉय यांच्या म्हणण्यानुसार लस घेताना काळजीपूर्वक विचार करण्याची गरज नाही, जर तुमचा नंबर लागला असेल तर तुम्ही लस घ्यायला हवी. त्याचवेळी, डॉ धर म्हणतात की, लसच्या पहिल्या डोसद्वारे प्रदान केलेले संरक्षण काही प्रमाणात मर्यादित आहे. कोरोना लस घेतल्यानंतरही तुम्हाला कोरोना संसर्ग झाला तरी त्याविरोधात लढण्यासाठी आपल्याला ताकद मिळते.

लसीकरणानंतर काय करावे -

अनेक जण लसीकरणानंतर मास्कचा वापर करणं टाळतात. लस घेतल्यानंतर शरीरात अँटीबॉडी तयार होण्यासाठी दोन आठवडे लागतात. त्यामुळे या काळात आणि त्यानंतर कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करणे आवश्यक आहे. कोरोना विषाणू नाकातून शरीरात प्रवेश करतो. त्यामुळे कायम मास्क वापर हा कोरोना संसर्ग रोखण्याचा एक उत्तम उपाय आहे.