Screen Addiction | (Photo credit: archived, edited, representative image)

How to Reduce Screen Time: आजच्या डिजिटल जगात मोबाईल (Smartphones), लॅपटॉप (Laptops), टीव्ही (TVs), टॅबलेट (Tablets) अशा उपकरणांचा वापर आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. काम, मनोरंजन आणि संवादासाठी स्क्रीनचा वापर (Screen Addiction) वाढल्यामुळे आता स्क्रीन अ‍ॅडिक्शन ही एक नविन आरोग्य समस्या (Digital Detox) बनली आहे – जी लहानांपासून ते प्रौढांपर्यंत सर्वांनाच प्रभावित करत आहे. ही सवय इतकी वाढली आहे की, त्याचा लहान मुलेच काय अगदी तरुण आणि ज्येष्ठांच्या मानसिक स्थितीवरही परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक अभ्यास, सामाजिक निरिक्षणे आणि आरोग्याच्या तक्रारी उद्भवू लागल्यानंतर मागणी होत आहे की, स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी काम व्ह्याला हवे. म्हणूनच जाणून घ्या, . स्क्रीन अ‍ॅडिक्शन म्हणजे काय, त्याची लक्षणे, परिणाम आणि स्क्रीन वेळ कमी करण्याचे प्रभावी उपाय काय?

स्क्रीन अ‍ॅडिक्शन म्हणजे काय?

स्क्रीन अ‍ॅडिक्शन ही एक वर्तनात्मक समस्या आहे ज्यामध्ये एखादी व्यक्ती डिजिटल उपकरणांचा अत्यधिक आणि सतत वापर करत राहते. जरी त्याचे आरोग्य, सामाजिक जीवन किंवा कामावर वाईट परिणाम होत असले तरीसुद्धा, स्क्रीन वापर थांबवता न येणे हे या समस्येचे मुख्य लक्षण आहे. (हेही वाचा, What Is Screen Addiction? स्क्रीन ॲडिक्शन म्हणजे काय? मुलांबासून आईबाबांपर्यंत, नातवंडांपासून आजीआजोबांपर्यंत वाढतो 'हा' आजार)

स्क्रीन अ‍ॅडिक्शनची सामान्य लक्षणे:

  • वेळेचा विसर पडून तासन् तास स्क्रीनकडे पाहत राहणे. खास करुन मोबाईल अ‍ॅडिक्शन.
  • स्क्रीनशिवाय बेचैनी किंवा अस्वस्थता वाटणे
  • जबाबदाऱ्या, कामकाज किंवा नातेसंबंधांकडे दुर्लक्ष करणे
  • डोकेदुखी, झोपेचा त्रास, डोळ्यांत जळजळ होणे
  • तणाव किंवा कंटाळा दूर करण्यासाठी स्क्रीनचा वापर करणे

स्क्रीन अ‍ॅडिक्शनमुळे होणारे आरोग्यावर परिणाम

  1. झोपेवर परिणाम: स्क्रीनमधून उत्सर्जित होणारे निळे प्रकाश झोपेच्या हार्मोनवर परिणाम करतात
  2. डोळ्यांची थकवा आणि कोरडेपणा: सतत स्क्रीनकडे पाहणे डोळ्यांना थकवते
  3. मानसिक आरोग्य समस्या: चिंतेचा विकार, नैराश्य आणि सामाजिक एकटेपणाची शक्यता
  4. शारीरिक हालचालींचा अभाव: स्क्रीनसमोर सतत बसल्यामुळे पाठदुखी, लठ्ठपणा आणि चुकीची शारीरिक ठेवण. (हेही वाचा, देशातील पहिलं मोबाईल व्यसनमुक्ती केंद्र प्रयागराज मध्ये; पहिल्याच दिवशी 15 जण उपचारासाठी दाखल)

स्क्रीन अ‍ॅडिक्शन टाळण्यासाठी उपयोगी टिप्स:

उपाय फायदा
स्क्रीन वेळेस मर्यादा घालणे मोबाईल अ‍ॅप्स किंवा डिव्हाईस सेटिंग्सद्वारे मर्यादा ठेवता येते
20-20-20 नियम वापरणे दर 20 मिनिटांनी, 20 फूट दूर पाहा, 20 सेकंदासाठी
डिजिटल डिटॉक्स दिवस आठवड्यातून एक दिवस स्क्रीनशिवाय घालवा
ऑफलाइन छंद जोपासा वाचन, खेळ, किंवा हस्तकला यासारख्या क्रियाकलापांमध्ये सहभाग
झोपेपूर्वी स्क्रीन टाळा झोपण्याच्या 1 तास आधी मोबाइल/लॅपटॉप वापरणे थांबवा
कौटुंबिक टेक नियम संपूर्ण कुटुंबासाठी स्क्रीन वापराचे नियम बनवा

व्यावसायिक मदत केव्हा घ्यावी?

स्क्रीन वापरामुळे दैनंदिन कामकाज, नातेसंबंध किंवा मानसिक स्थितीवर परिणाम होऊ लागला असेल, तर तज्ञांकडून मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे. कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी (CBT) सारख्या उपचार पद्धती स्क्रीन अ‍ॅडिक्शनवर प्रभावी ठरू शकतात.

दरम्यान, डिजिटल तंत्रज्ञान अपरिहार्य असले तरी, त्याचे व्यसन टाळता येते. जागरुकता, वेळेची मर्यादा आणि नियोजनपूर्वक ऑफलाइन वेळ घालवण्यामुळे आपण स्क्रीन अ‍ॅडिक्शनपासून स्वतःचे संरक्षण करू शकतो. तंत्रज्ञान आणि आरोग्य यामध्ये योग्य समतोल राखणे आजच्या काळात अत्यावश्यक आहे.